शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

योजनांपासून अल्पसंख्याक राहिले दूर

By admin | Updated: May 18, 2016 03:19 IST

काँग्रेस सरकारने जनहितासाठी अनेक योजना मंजूर केल्या.

कल्याण : काँग्रेस सरकारने जनहितासाठी अनेक योजना मंजूर केल्या. परंतु त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस कार्यकर्ते व प्रशासन कमी पडले. त्यामुळे अल्पसंख्याकांना अशा योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकलेला नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व वित्त विभागाचे सदस्य प्रकाश मुथा यांनी रविवारी व्यक्त केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘करिअर गाइडन्स व एज्युकेशन पॉलिसीज फॉर मायनॉरिटीज’ या विषयांवर जनजागृतीसाठी घेतलेल्या शिबिरात मार्गदर्शन करताना मुथा बोलत होते. यावेळी प्रदेश चिटणीस अलका आवळसकर, सदानंद तथा बाबा तिवारी, प्रशांत तोषणीवाल, सुनील खांडगे, अल्पसंख्याक विभागाचे कल्याण विभागाचे अध्यक्ष एजाज मौलवी, इफ्तेखार खान, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा लता जाधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजन व शैक्षणिक व्यवस्थेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच शैक्षणिक व्यवस्थेचे प्राचार्या श्रुती वायकर यांनी सादरीकरण केले. काँग्रेस सरकारने शैक्षणिक प्रक्रिया सुधारण्यासाठी केलेल्या कायद्याची माहिती यावेळी मुथा यांनी दिली. सक्तीचे शिक्षण देऊन देशातून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यात काँग्रेसने योगदान दिले. अल्पसंख्याक म्हणजे मुस्लीम हा प्रचार खोटा आहे. अनेक समाजांचा अल्पसंख्याकांमध्ये अंतर्भाव आहे. शिक्षणाबाबत महिलांनाही साक्षर करून त्यांचा सामजिक स्तर उंचावला पाहिजे, हेच सूत्र काँग्रेसचे असल्याचे ते म्हणाले. भिवंडी, मालेगाव सारख्या अल्पसंख्याकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शहरांत अल्पसंख्याक इंजिनिअरींग कॉलेज उघडण्यासाठी मोठे योगदान देण्याची भूमिका काँग्रेस सरकारने घेतली होती. मात्र, हा उपक्रम राबविण्यास अपयश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ टक्केआरक्षण, चार लाखांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज अशा योजनांचा वेध यावेळी मुथा यांनी घेतला. काँग्रेस कमिटीने घेतलेला हा उपक्रम शैक्षणिक मदतीसाठी आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)