शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विजेचा अनुशेष दूर करा

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.

अन्याय : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विजेचा अनुशेष व पायाभूत सुविधांमधील असमतोल दूर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.राज्यातील सर्वाधिक वीज विदर्भात तयार होते. यानंतरही विदर्भातील ग्रामीण भागात १८ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. पिकाला पाणी द्यायच्या वेळी वीज नसते. विजेच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतही विदर्भावर अन्याय झाला आहे. ग्रामीण भागातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दोन-तीन महिने दुरुस्ती केली जात नाही किंवा नवीन ट्रान्सफार्मर लावल्या जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. महावितरणतर्फे संरचना विकास योजनेंतर्गत २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षासाठी ५५५६ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी १८९८.९७, उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी १०७२.१४, तर मुंबई-ठाणेतील तीन जिल्ह्यांसाठी ७५२.८१ कोटी रुपयांचा वाटा निर्धारित करण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी केवळ ८७९ कोटी रुपये मिळणार आहेत.एकट्या बारामतीला ९५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून विदर्भावरील अन्याय स्पष्ट होतो, असे समितीने स्पष्ट केले आहे. राज्याच्या वीजनिर्मितीमध्ये ५५ टक्के वाटा विदर्भाचा आहे. विदर्भात ५२६० मेगावॅट कोळसाधारित वीज तयार होत असून यापैकी किमान २२०० आणि कमाल ३००० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते. ३००० मेगावॅट वीज इतर प्रदेशात निर्यात केली जाते. मुंबई, पुणे व नाशिकला कोणतेही भारनियमन न करता २६०० मेगावॅट वीज पुरविली जाते, अशी माहिती समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)