शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीने वेतन आयोग लांबणीवर

By admin | Updated: June 13, 2017 05:07 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बसू शकतो. या कर्जमाफीमुळे कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची

- यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बसू शकतो. या कर्जमाफीमुळे कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ज्या पद्धतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता किमान ४० हजार कोटी रुपयांची तजवीज शासनाला त्यासाठी करावी लागणार आहे. अशा आर्थिक कसरतीतून वाटचाल करावी लागणार असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसमोर सातवा वेतन आयोग देण्याचेही आव्हान आहे. राज्यातील १८ लाख कर्मचारी आणि अधिकारी तसेच साडेसहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करायचा तर किमान वार्षिक १८ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल. राज्य शासनाच्या विविध विभागांना २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीला १५ ते २० टक्क्यांचा कट लावावा लागला होता. कर्जमाफी, सातवा वेतन आयोग असा एकत्रित बोजा पडला तर हा कट २५ टक्क्यांच्या घरात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते अशा सगळ्या परिस्थितीत सातवा वेतन आयोग तातडीने लागू करणे शक्य होणार नाही. कर्जमाफी देण्याचे स्वागतच, पण... केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करावी, अशी मागणी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सध्या लावून धरली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, शासनाची आर्थिक अडचण आम्ही समजू शकतो. शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करीत असल्याचे तत्काळ जाहीर करावे आणि त्यानुसार पुढील महिन्याच्या वेतनात सुधारणा करावी.१ जानेवारीपासूनची १७ महिन्यांची थकबाकी काही हप्ते पाडून देण्यास आमची हरकत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आम्ही स्वागतच केले आहे; पण वेतन आयोगासाठीची तरतूद शासनाला दर दहा वर्षांनी करायचीच असते. त्यामुळे कर्जमाफीचे कारण देऊन वेतन आयोग लांबणीवर टाकणे योग्य ठरणार नाही, असेही कुलथे म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे ३१ मार्च २०१८ रोजी राज्य सरकारवर तब्बल ४ लाख १० हजार कोटी रुपयांचे कर्ज असेल. या कर्जाच्या परतफेडीसाठी शासनाला वर्षाकाठी ३० हजार कोटी रुपये मोजावे लागतात. वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य शासन तत्पर राहिले आहे असा आधीचाही अनुभव नाही. सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ रोजी केंद्र सरकारने लागू केला होता. राज्याने तो तब्बल २००९ मध्ये लागू केला आणि तीन वर्षांची थकबाकी पाच हप्त्यांमध्ये दिलेली होती. कर्मचारी, अधिकारी संघटनांनी ती मान्य केली होती.