शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

‘म्हणून’... एक स्मरण!

By admin | Updated: January 21, 2017 06:26 IST

लौकिकाशी नाळ ठेवत प्रतिष्ठित बनलेल्या जनस्थान पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी विजया राजाध्यक्ष.

कविवर्य कुसुमाग्रजांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या आणि त्यांच्या लौकिकाशी नाळ ठेवत प्रतिष्ठित बनलेल्या जनस्थान पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी विजया राजाध्यक्ष. समीक्षेच्या आणि एकूणच साहित्याच्या प्रांतात अमिट ठसा उमटविणाऱ्या विजया राजाध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा होताच एक स्मरण अगत्याचे ठरले. ‘म्हणून’ हे एक स्मरण...साहित्याच्या प्रांतातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च सन्मान. विष्णू सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णूने. विष्णू वामन शिरवाडकर यांनी. तत्पूर्वी १९८२ नंतर विशिष्ट साहित्यकृतीसाठी तो जाहीर करण्याची परंपरा खंडित झाली. विशिष्ट भाषेच्या साहित्य सेवेसाठी तो बहाल करण्याची नवी परंपरा रुजू झाली. याच परंपरेचे पालन करून वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना १९८७चा पुरस्कार १९८८ मध्ये जाहीर झाला. यातील दुसरा पण विचित्र योगायोग म्हणजे ८७च्या पुरस्कारासाठी निवड समितीच्या पुढ्यात असलेली दोन्ही नावे मराठीतल्याच साहित्यिकांची. शिरवाडकर आणि पु.ल. देशपांडे. निवड समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि बहुभाषा कोविद पी.व्ही. नरसिंह राव.केवळ राजकारणातच गटतट असतात असे निर्भर्त्सनापूर्ण उसासे टाकीत राहणाऱ्या साहित्यिकांमध्येही ते असतातच. किंबहुना अधिक तीव्रतेने असतात. भूपृष्ठावर फारसे येत नाहीत, इतकेच. स्वाभाविकच काही पु.ल. देशपांडे यांचे समर्थक तर काही कुसुमाग्रज समर्थक. कोण आपला, कोण त्यांचा हे दोहोंना चांगलेच ज्ञात. दोन्ही गटांचे दडपण तुल्यबळ. निवड समितीदेखील गांगरलेली. अखेर एक गद्यलेखक तर दुसरा कवी आणि कवितेमध्ये जे वैश्विक आवाहन असते, ती जशी साऱ्या सीमा उल्लंघणारी असते, तसे गद्य नसते म्हणून निवड समितीचे तुळशीपत्र कुसुमाग्रजांच्या पारड्यात. ज्ञानपीठाच्या परंपरेला साजेशा कार्यक्रमात मुंबईत कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ बहाल करण्यात आले. मोठा नयनरम्य आणि श्रवणसुंदर सोहळा पार पडला. दरम्यानच्या काळात कुसुमाग्रजांची एक कविता अवतरली.म्हणून विजयासाठी कविता माझी कधीच नव्हतीम्हणून नव्हती भीती तिला पराजयाचीजन्मासाठी हटून केव्हां नव्हती बसलीम्हणून नाही खंतहि तिला मरावयाची.*****कुसुमाग्रज हे नाशिकचे ग्रामदैवत. त्यांना ज्ञानपीठ प्राप्त झाल्याचा अवर्णनीय आनंद नाशिककरांना झाला. त्यातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अवतार उदयास आला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आडसाली जनस्थान हा साहित्य पुरस्कार देण्याची कल्पना दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांनी जन्मास घातली. आणि यंदाचा जनस्थान विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला. त्यानिमित्ते हे स्मरण.