शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांना मिंळाला दिलासा

By admin | Updated: August 26, 2014 02:46 IST

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठीही पुरेशी रक्कम जमविण्यात हतबल ठरत असलेल्या वृद्ध गिरणी कामगारांसाठी एक दिलासादायक बाब आहे

मुंबई : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठीही पुरेशी रक्कम जमविण्यात हतबल ठरत असलेल्या वृद्ध गिरणी कामगारांसाठी एक दिलासादायक बाब आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक रक्कम भरण्यासाठी त्यांना आता आणखी १२० दिवस म्हणजे तब्बल चार महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र (पीओएल) मिळाल्यानंतर एकूण ३०० दिवसांचा अवधी मिळणार असून, त्यापैकी सुरुवातीच्या १२० दिवसांमध्ये कसल्याही व्याजाची आकारणी केली जाणार नाही.गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना घराच्या रकमेची पूर्तता करणे अशक्यप्राय बनल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, म्हाडा प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी म्हाडाने गिरणी कामगारांसाठी ६ हजार ९२५ घरांची सोडत काढली होती. साडेसात लाख रुपयांना त्यांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजतागायत ४,६५४ विजेत्यांना घराचा ताबा मिळाला आहे. उर्वरितांचा ताबा अर्जाची छाननी, रकमेची पूर्तता करण्याच्या कामात रेंगाळला आहे. छाननीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांना एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम भरण्यासाठी ‘पीओलएल’ मिळाल्यानंतर सुरुवातीला ३० दिवसांचा अवधी व त्यानंतर उर्वरित ९० टक्के रकमेच्या पूर्ततेसाठी ९० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर पैसे भरणाऱ्यांना संबंधित रकमेवर १३.५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद होती. मात्र विजेत्यांना पणन विभागाकडून उशिरा पत्र जाणे, बहुतांश कामगार मुंबईबाहेर असणे आणि या व्यवहारासाठी निवडण्यात आलेल्या मुंबै बॅँकेच्या गलथान कारभारामुळे मुदतीत पत्रव्यवहार न झाल्याने त्यांना दोन्ही टप्प्यांतील रकमेच्या मुदतीसाठी अनुक्रमे ४५ व १०५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.गेल्या वर्षी १२ जुलैला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये त्यासाठी आणखी प्रत्येकी १५ दिवस म्हणजे १० टक्के रकमेसाठी ६० तर ९० टक्के रकमेच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. (प्रतिनिधी)