शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांवर उपचार

By admin | Updated: October 26, 2016 02:02 IST

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूचा आलेख देखील वाढत आहे. या गंभीर परिस्थितीत राजकीय वातावरणही चांगलेच तापले.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूचा आलेख देखील वाढत आहे. या गंभीर परिस्थितीत राजकीय वातावरणही चांगलेच तापले. मात्र, या चर्चेत पडण्याऐवजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारपासून जव्हार तालुक्यात विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी आढळून आलेल्या ५११ कुपोषित बालकांवर तत्काळ तिथेच उपचारदेखील सुरु करण्यात आले आहेत. पालघर तालुक्यातील जव्हार-मोखाडासारख्या आदिवसी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असूनही या ठिकाणी कुुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही. याविषयावर नेहमीच उलट-सुलट चर्चा सुरु असतात. गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा प्रश्न चर्चेत आहे. पण, कुपोषणाच्या आकडेवारीत स्पष्टता यावी, ज्या कुपोषित बालकांना उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना उपचार मिळावेत म्हणून ४ दिवसीय विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी जे.जे. रुग्णालयातील १० बालरोग चिकित्सक आणि ५० इंटर्न डॉक्टर पालघर तालुक्यातील जव्हार येथे दाखल झाले आहेत. गिरीष महाजन यांनी राज्यातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. यामुळे कुपोषित बालकांचा शोध घेतला जाईल. त्यामुळे तिकडची परिस्थिती लक्षात येईल आणि त्यांच्यावर उपचार झाल्यास कुपोषणाची परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. (प्रतिनिधी)१३, ५६६ बालकांची तपासणीजामसर येथील एकूण १३ हजार ५६६ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. ही सर्व मुले ० ते १० वयोगटातील आहेत. २ हजार ४७५ लहान मुलांपैकी ३९२ मुलांना कुपोषणाची सुरुवात झाली असल्याचे आढळून आले. तर, १४६ मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात आढळले. 551 कुपोषित मुलांचे पाय सूज आली होती. या ५११ मुलांना तत्काळ तिकडच्या आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. या मुलांवर उपचार करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातून डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले असून तेथील आरोग्य केंद्रात ते मुलांवर उपचार करीत आहेत. तत्काळ उपचार देण्याचे आदेश’ सोमवार, २४ आॅक्टोबरपासून जव्हार तालुक्यात कुपोषणाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्वेक्षणात वनवासी कल्याण आश्रम आणि अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. जव्हार तालुक्यातील जामसर येथे सोमवारी सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. कुपोषणग्रस्त भागांमध्ये सर्वेक्षण करुन तत्काळ उपचार आणि आकडेवारी एकत्रित करण्याचे आदेश गिरीश महाजन यांनी दिले आहेत. - डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय