शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दर्जाच्या जोरावर लिडकॉमच्या उपक्रमाची पुन्हा भरारी

By admin | Updated: June 12, 2017 02:32 IST

येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ‘लिडकॉम’ या पादत्राणे उत्पादन केंद्राची उत्पादने एकेकाळी केवळ शासकीय

संतोष भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ‘लिडकॉम’ या पादत्राणे उत्पादन केंद्राची उत्पादने एकेकाळी केवळ शासकीय अस्थापनांसाठीच वापरण्यात येत असत; पण आता लिडकॉम खासगी बाजारपेठेतील स्पर्धेत उतरली आहे. मनुष्यबळाअभावी विक्री केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. मात्र, तरीही ग्राहक थेट कारखान्यातूनच चपला व बुटांची खरेदी करीत आहे.पूर्वी एसटी महामंडळ, शासकीय कार्यालय, पोलीस प्रशासन आदी विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बुट पुरविण्याचे कंत्राट मिळायचे. आता ते सर्व बंद झाले; परंतु ग्राहकांचा या उत्पादनावर विश्वास असल्याने, थेट खासगी बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय लिडकॉमने घेतला आहे.लिडकॉमची दर्यापूर, कोल्हापूर व हिंगोली अशा केवळ तीनच ठिकाणी उत्पादन केंद्रे असून वाशी, वांद्रे, नांदेड, जळगाव, भुसावळ, सोलापूर या ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. सध्या या विक्री केंद्रांवर उत्पादनाला मोठी मागणी आहे.हिंगोलीत उत्पादन केंद्रावर असलेल्या आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे लिडकॉमच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिंगोली येथील पादत्राणे उत्पादन केंद्रात अवघ्या चार मिनिटांत ९ जोड बनविले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. व्यवस्थापकीय संचालक रूपेश जयवंशी यांनी या ठिकाणी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. येथे स्वतंत्र डिझायनर असल्यामुळे आतापर्यंत १० ते १५ प्रकारची डिझायन बनविलेली आहेत. दिवसेंदिवस या उत्पादनाची मागणी वाढल्याने येथे आणखी एक इमारत उभारण्यात येणार आहे.