शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांच्यासह ११ संचालकांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: February 13, 2016 02:28 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अकरा संचालकांना शुक्रवारी तात्पुरता दिलासा मिळाला. सरकारने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अकरा संचालकांना शुक्रवारी तात्पुरता दिलासा मिळाला. सरकारने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली असून पुढील सुनावणी दोन मार्चला होणार आहे. तोपर्यंत वटहुकुमानुसार कारवाई न करण्याचे लेखी आश्वासन सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. न्यायालयाने वटहुकुमानुसार कारवाईस स्थगिती न दिल्याने संचालकांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलेल्या संचालक मंडळाला दहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असा वटहुकुम राज्य सरकारने काढला. या वटहुकुमाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सहकारी बँकेसह सांगली, कोल्हापूर व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. वटहुकुमाविरोधात या बँकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती धर्माधिकारी व न्यायमूर्ती पटेल यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारच्यावतीने सिनीअर कौन्सिल अनिल साखरे व विनीत नाईक यांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. वटहुकुमाप्रमाणे संचालकांना पंधरा दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्यावतीने देण्यात आल्याचे जिल्हा बँकेचे अ‍ॅड. जहागीरदार व अ‍ॅड. पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पुढील म्हणणे सादर करेपर्यंत म्हणजेच दोन मार्चपर्यंत सरकारच्यावतीने कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन सरकारच्यावतीने न्यायालयात देण्यात आले. (प्रतिनिधी)