शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दोन रुग्णालयांत तणाव

By admin | Updated: April 2, 2017 01:26 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते

औरंगाबाद : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्याने शहरातील घाटी रुग्णालयात शनिवारी तणावपूर्ण वातावरण होते. तर, एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही रुग्णाच्या मृत्यूनंतर तशीच स्थिती उद्भवली होती. तर सेव्हन हिल परिसरातील जिल्ला हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार न झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणास उपचारासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटीतील अपघात विभागात आणल्यानंतर डॉक्टरांनी तासभर दुर्लक्ष केले. त्यानंतर किरकोळ उपचार करून त्याला घरी पाठवले; परंतु रुग्णालयाबाहेर पडताच रुग्णाचा मृत्यू झाला. ट्रॉमा केअरमध्ये दाखल करून केवळ उपचाराचा देखावा केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. शरद महावीर वायकोस (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. वेळेवर उपचार दिले असते तर माझा भाऊ प्राणाला मुकला नसता. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून हा सगळा प्रकार समोर येईल. घाटी प्रशासनाने योग्य तो न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद यांचा भाऊ प्रशांत वायकोस यांनी दिली. (प्रतिनिधी)‘जिल्ला’मध्ये तोडफोडजिल्ला हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मेंदूविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती अधिक चिंताजनक होताच संतप्त नातेवाईकांनी धुडगूस घालून रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. रेल्वेस्टेशन परिसरातील ६८ वर्षीय महिलेवर २७ मार्च रोजी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याने आवश्यक शस्त्रक्रियेसाठी एशियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ४० वर्षीय रुग्णाचा शनिवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हृदयाच्या व्हॉलला इजा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून व्हॉल बदलला; परंतु या सगळ्यामध्ये रुग्णाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. प्रकाश नानाभाऊ गोंडे (रा. नारेगाव) असे मृत रुग्णाचे नाव आहे.