शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

56 इंच छाती असेल तर जाधव यांची सुटका करा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 18:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती असेल तर त्यांनी शिष्टमंडळासह पाकिस्तानात जावून जाधव यांची सुटका करावी

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. 12 - भारतीय नागरिक व महाराष्ट्राचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक केली. कोणताही ठोस पुरवा नसताना त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती असेल तर त्यांनी शिष्टमंडळासह पाकिस्तानात जावून जाधव यांची सुटका करावी, असे आव्हान  प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी  केले.
जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस प्रयत्न करावे यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभरात स्वाक्षरी  मोहीम राबविली जाणार आहे. येथील व्हरायटी चौकात आयोजित कार्यक्रमात या मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक  यावेळी उपस्थित होते.  
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. कोणालाही शिक्षा सुनावताना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. परंतू जाधव यांना ही संधी नाकारण्यात आली. भारताला कमी लेखण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केले आहे.  पंतप्रधान लग्नसमारंभासाठी पाकिस्तानात जातात. मग शिष्टमंडळासह पाकिस्तानात जावून त्यांनी जाधव यांना भारतात परत आणावे. अशी देशातील नागरिकांची भावना आहे. यासाठी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविली जात असल्याचे अशोक चव्हाण यांनी सागितले.