शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

सहा लाख बांधकामांना दिलासा

By admin | Updated: March 13, 2016 02:26 IST

उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून राज्यातील शहरी भागांत डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलली सर्व अनधिकृत बांधकामे माणुसकीच्या भूमिकेतून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नारायण जाधव, ठाणेउल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून राज्यातील शहरी भागांत डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलली सर्व अनधिकृत बांधकामे माणुसकीच्या भूमिकेतून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ठाणे-पालघर जिल्ह्यांतील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, वसई-विरार या सात महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर, पालघर, डहाणू, जव्हार या पाच नगरपालिकांच्या क्षेत्रातील अंदाजे साडेपाच ते सहा लाखबांधकामांना होणार आहे. त्याच वेळी टीडीआर, क्लस्टरपाठोपाठ या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांवर सर्वात मोठा बोजा पडणार आहे.हरित वसई या संस्थेने तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेनंतर राज्य विधिमंडळात झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री नारायण राणे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या २०१० च्या नागपूर अधिवेशनात अशी बांधकामे नियमित करण्याचे संकेत दिले होते. परंतु, निर्णय मात्र झाला नव्हता. आता तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्वच बांधकामे काही अटी व शर्तींवर नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.२०१० साली तत्कालीन ठाणे जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक बांधकामे असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांत तर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मतांच्या राजकारणासाठी राज्यकर्त्यांनी त्यांना पाठीशी घातल्याने या बांधकामांना कोणीही हात लावलेला नाही.आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१५ पर्यंत सरसकट सर्वच बांधकामे नियमित करण्याची घोषणा करताच त्याचे श्रेय लाटण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांत चढाओढ लागली आहे. आमच्यामुळेच ही बांधकामे अधिकृत होत आहेत, असे सांगण्याचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र या अटी व शर्ती अद्याप घोषित न झाल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.सर्वत्र अनधिकृत बांधकामांचा विळखा२०१० च्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक बांधकामे होती. मात्र, आजघडीला त्यात मोठी वाढ झाली आहे. ठाण्यात घोडबंदर, कळवा-मुंब्रा, शीळ-डायघर, वसई-विरार, भार्इंदरचा खाडीकिनारा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कल्याण-डोंबिवलीतील गावठाणे, भिवंडी, मुरबाड आणि शहापूरच्या महामार्गालगतचा परिसर, वन खात्याची जमीन आणि नवी मुंबईत दिघ्यासह करावे, गोठिवली, घणसोली, नेरूळ, सीबीडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत.दोषींवर कारवाई हवी!अनधिकृत बांधकामे नियमित करताना ती पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेताना सरकारने सध्याची बांधकामे कोणी केली, कोणत्या नगरसेवक व आमदाराच्या काळात झाली, त्या वेळी कोण पालिकेचे आयुक्त, विभाग अधिकारी होते, कोणी त्या बांधकामांना घरक्रमांक दिले, पाणी व वीज कनेक्शन दिले, स्टॅम्प ड्युटी कुणी घेतली, याचा तपास करून त्यावर कारवाई करायला हवी. तरच, यापुढील काळात अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकतो. अन्यथा, पालथ्या घड्यावर पाणी पडून पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणत भूमाफिया गोरगरिबांना नाडतच राहतील. या सर्व दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात स्पष्ट धोरणही निर्णयात असावे, अशी भावना आपली आयुष्याची जमापुंजी खर्चून घर घेणाऱ्यांत उमटू लागली आहे.ठाणे :- १ लाख २३ हजार ७८०, मीरा-भार्इंदर :- २ लाख ४७ हजार (मात्र महापालिकेच्या मते केवळ २० हजार), वसई-विरार :- ५० हजार, कल्याण-डोंबिवली :- ६७ हजार १९७, उल्हासनगर :- १ लाख १३ हजार ७६७, नवी मुंबई :- २७ हजार ४१० मोठी तर २३ हजार, किरकोळ (फक्त महापालिका क्षेत्र), सिडको क्षेत्रात २०१२ पर्यंत २५ हजाराहुन अधिक अतिक्रमणे असून हे क्षेत्र सुमारे ११८ हेक्टरहून अधिक आहेत, भिवंडी :- चार हजारहुन अधिकयापूर्वी युती सरकारने शिवशाही योजनेच्या नावाखाली मुंबईत झोपडीधारकांना मोफत घरे देण्याची योजना आणली होती़ त्यानंतर, राज्यात झोपड्यांचे पेव फुटून प्रत्येक शहराला झोपड्यांनी वेढले होते़ यानंतर, आधी १९९५ तर २००० सालापर्यंतच्या झोपड्या, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे ठरले. परंतु, आता थेट त्यांना २०१५ ची डेडलाइन दिली आहे़ शासनाची अशी धोरणेच झोपड्या अन् अनधिकृत बांधकामे वाढायला कारणीभूत ठरत असल्याचा सूर उमटू लागला आहे.