शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

समान वीजदरात ‘रिलायन्स’चा कोलदांडा

By admin | Updated: September 7, 2016 06:06 IST

१०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या मुंबईतील घरगुती वीज ग्राहकांना समान वीज दर देण्यास तीन वीज कंपन्या राजी झाल्या

मुंबई : १०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या मुंबईतील घरगुती वीज ग्राहकांना समान वीज दर देण्यास तीन वीज कंपन्या राजी झाल्या असून रिलायन्स एनर्जीने मात्र सहमती दर्शविलेली नाही, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले. मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत ते म्हणाले की, टाटा पॉवर, बेस्ट आणि महावितरण यांनी समान वीजदरास होकार दिला आहे पण, आम्हाला १५० कोटी रुपयांचा फटका बसेल. ही भरपाई कोण देईल अशी विचारणा करीत रिलायन्सने हात वर केले आहेत.या कंपनीने आपला आस्थापना खर्च कमी करावा, असे आपण सांगितले आहे पण त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही, असे ते म्हणाले. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जी या दोन कंपन्यांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांमार्फत (कॅग) चौकशी करण्याची घोषणा होऊन महिना लोटला तरी अद्याप त्या बाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, हेही आज स्पष्ट झाले. या कंपन्या दरवाढीसाठी एमईआरसीकडे परस्पर प्रस्ताव देतात, त्यात त्यांना येणाऱ्या खर्चाची आकडेवारी देऊन दरवाढ पदरात पाडून घेतात. शासनाला या बाबत कळविलेदेखील जात नाहीत, असे आरोप झाल्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या दोन्ही कंपन्यांच्या गेल्या दहा वर्षांमधील लेख्यांची चौकशी कॅगमार्फत करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. तथापि, आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी या चौकशीचे आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत. आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविलेला आहे, असे सांगितले. दिल्ली सरकारने अशाच पद्धतीने कॅगची लावलेली चौकशी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, याकडे लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले की कॅगमार्फत चौकशीचीच आमची भूमिका आहे. प्रकरण न्यायालयात गेले तर आम्ही तेथेही ही भूिमका मांडू. या दोन्ही कंपन्यांनी दरवाढीसाठी ज्या याचिका एमईआरसीकडे केल्या होत्या त्यांची तपासणी केली जाईल कारण जनतेला आणि सरकारला ते जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.