शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशन विश्वातील ‘टार्गेट’ क्वीन

By admin | Updated: March 8, 2016 02:54 IST

डॉ. कल्पना गंगारामानी... अवघ्या ४५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रकाशन व्यवसायात उडी घेतली आणि स्वत:ची कंपनी स्थापन करत, टर्नओव्हर १७ कोटींवर पोहोचवला.

मनीषा म्हात्रे,  मुंबईडॉ. कल्पना गंगारामानी... अवघ्या ४५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रकाशन व्यवसायात उडी घेतली आणि स्वत:ची कंपनी स्थापन करत, टर्नओव्हर १७ कोटींवर पोहोचवला. प्रकाशन विश्वाच्या त्या ‘टार्गेट क्वीन’ ठरल्या आहेत. कल्पना यांच्या वडिलांचा लिंबाचा व्यवसाय होता. दादर येथील मराठमोळ्या कुटुंबात चार भावंडांसोबत त्या वाढल्या. बीएएमएसची पदवी मिळवली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी, असे त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळावीत, म्हणून स्वत:च प्रयत्न सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २६व्या वर्षी त्यांनी प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले. भांडवलाचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. त्यांनी स्वत:कडील पुंजी खर्च करत ‘टार्गेट प्रकाशन’ सुरू केले. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम सोपा करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे प्रत्येक मांडणी, मजकुरावर भर दिला गेला. त्यासाठी मुंबईतल्या अनेक शाळांशी चर्चा करण्यात आली, सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. दिवसभर लेखक, शिक्षक यांच्या भेटीगाठी आणि रात्री त्याचा आढावा असा दिनक्रम होता. ज्युनियर केजीपासून महाविद्यालयापर्यंतच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. चार वर्षे स्ट्रगल केल्यानंतर, मातृत्वाच्या वाटेवर असताना टार्गेट प्रकाशन समूहाचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर झाले. अनेकदा मुलीला सोबत घेऊन कार्यालयात जावे लागे. रात्रभर जागून काम करावे लागे, पण त्यांनी हार मानली नाही. त्यामुळेच त्या आज हा टप्पा गाठू शकल्या आहेत.