शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पुलाचे ५ जूनला लोकार्पण

By admin | Updated: June 4, 2017 01:25 IST

महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणार आहे. भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्या वर्षी २ आॅगस्टला अतिवृष्टीमुळे कोसळला होता. या दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल नव्याने बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या आश्वासनाची पूर्तता त्यांनी मुदतीपूर्वी केली आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या, अर्थात महाड जंक्शन ते रायगड किल्ला (जिजाऊमाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेलेल्या आंबवडे-राजेवाडी या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजनही या वेळी होणार आहे. या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र म केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहनिर्माणमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, उद्योग व खाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे, अशी माहितीही आमदार ठाकूर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती झालेल्या या परिषदेस भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, अनेष ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. विक्रमी वेळेत काम पूर्णसावित्री नदीवरील नवीन पुलाच्या कामाला १५ डिसेंबर २०१६ रोजी सुरुवात होऊ न, ३१ मे २०१७ रोजी काम पूर्ण झाले आहे. वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सहा महिन्यांच्या आत विक्र मी वेळेत हे काम केले असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले. नव्या पुलाची वैशिष्ट्ये१.गाळे रचना :- एकूण ११ गाळे व त्यांची लांबी २३९ मी. २.पाण्याचा प्रकार :- ओपन फाउंडेशन २ मी. खोल.३.पुलाची रु ंदी :- १६ मी. (३ पदरी) ४.जोड रस्ता :- मुंबई व गोवा बाजूस मिळून ६४० मी. ५.पुलावर रात्रीसाठी पथदीप सुविधा व पदपथ (फुटपाथ).६.पूर गजर प्रणाली, गंजरोधक सळ्या, रस्ता सुरक्षा उपाययोजना आणि अ‍ॅन्टी कार्बोनेशन रंग.७. १६५ दिवसांत काम पूर्ण.८. ३५.७७ कोटी रुपये खर्च.