शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘लोढा अरिया’तील रहिवाशांना दिलासा

By admin | Updated: May 17, 2017 01:46 IST

लोढा समूहाच्या ‘लोढा अरिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमारतीतील बेकायदा बांधकामांना हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने येथील रहिवाशांना नोटीस बजावली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोढा समूहाच्या ‘लोढा अरिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमारतीतील बेकायदा बांधकामांना हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने येथील रहिवाशांना नोटीस बजावली. उच्च न्यायालयाने रहिवाशांना दिलासा देत १३ जूनपर्यंत या नोटीसला स्थगिती दिली आहे.‘लोढा अरिया’ मधील तळमजला व पहिल्या मजल्यावरील बांधकाम बेकायदा असल्याचा दावा करत महापालिकेने इमारतीला ९ मे रोजी नोटीस बजावली. नोटीसनुसार, या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सोसायटीचे कार्यालय, लॉबी, सुरक्षारक्षकांची खोली, स्वयंपाकगृह आणि सभागृह बेकायदा बांधण्यात आले आहे. महापालिकेकडून यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेने हे बेकायदा बांधकाम इमारतीलाच पाडण्याचे आदेश दिले. अन्यथा महापालिका स्वत:च कारवाई करेल, असा इशारा महापालिकेने नोटीसद्वारे इमारतीतील रहिवाशांना दिला. कारवाई करण्याची मुदत मंगळवारपर्यंत असल्याने रहिवाशांनी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयापुढे याचिका सादर केली. न्या. अजय गडकरी व न्या. सी. भडंग यांच्या खंडपीठाने या नोटीसला स्थगिती दिली. ‘हे बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही,’ अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील जोएल कार्लोस याने खंडपीठाला दिली. त्यांचा हा युक्तिवाद मान्य करत उच्च न्यायालयाने रहिवाशांना तात्पुरता दिलासा दिला आहे.