शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘ये रिश्ता क्या कहलाता...’ मधून बोध घेतला अन् नऊ वर्षांच्या जुळ्या बहिणींनी केला अपहरणाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:37 IST

शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली.

ठळक मुद्देतत्काळ पालक व मुलींना घेऊन घटनास्थळ गाठले. शिकवणीला दांडी मारली त्यामुळे आई मारेल, या भीतीने अशा पद्धतीचा खोटा बनाव केल्याचे सांगितले.शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत

नाशिक : शिकवणीसाठी ‘त्या’ दोघी नऊ वर्षांच्या जुळ्या बहीणी गुरूवारी संध्याकाळी घराबाहेर पडल्या...रस्त्यातील एका विठ्ठल मंदिरात खेळण्यासाठी रमल्या...शिकवणीची वेळ कधी सरली हे त्यांच्याही लक्षात आले नाही...जेव्हा लक्षात आले तेव्हा त्या घाबरल्या...शिकवणीला गेलो नाही म्हणून आई मारणार या भीतीने त्यांनी ‘आयडिया’ लढवून चार दिवसांपुर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं...’ मालिकेत दाखविण्यात आलेल्या सीनवरून त्यांनी अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे पोलिसांना मुलींनी दिलेल्या कबुलीमधून समोर आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील रहिवासी असलेल्या नऊ वर्षांच्या दोघी जुळ्या बहिणी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार कथन केला. घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गंभीरपणे घेत तत्काळ पालक व मुलींना घेऊन घटनास्थळ गाठले. तेव्हा त्या मुलींना एक अनोळखी घर दाखवून या घरातच आम्हाला कोंडून ठेवले होते, असे सांगितले. यावेळी पोलिसांच्या पथकाने  संशयित घराजवळ जाऊन पाहणी केली असता मुली खोट्या बोलत असून, ते बनाव करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दोघी मुलींना वाहनातून आई-वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी कड यांनी प्रेमाने त्यांच्याशी स्वतंत्र संवाद साधला असता शिकवणीला दांडी मारली त्यामुळे आई मारेल, या भीतीने अशा पद्धतीचा खोटा बनाव केल्याचे सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणPolice Stationपोलीस ठाणे