शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलती

By admin | Updated: February 16, 2017 18:48 IST

करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलती

करमाळ्यात नात्या-गोत्याच्या राजकारणाची चलतीकरमाळा : आॅनलाईन लोकमत सोलापूरतालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भावकीचे राजकारण रंगले असून पाहुणे-रावळे, नाती-गोती व सग्या-सोयऱ्यांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या असून आता मतदान फिक्स करताना नात्या-गोत्याची ओळख निघू लागली आहे.जिल्हा परिषदेच्या कोर्टी गटातून झोळ कुटुंबीयातील दोन सुना एकमेकांविरुद्ध लढत देत आहेत. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ बागल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून तर आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ यांच्या पत्नी स्वाती झोळ या संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीतून एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. तसाच प्रकार जेऊर पंचायत समिती गणातून चिखलठाण येथील सरडे कुटुंबीयात झाला आहे. आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे हे महाआघाडीतून उभे असून पै. दत्तात्रय सरडे शिवसेना तर अजिनाथ सरडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. सरडे यांच्यात भावकीचे राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने रंगले आहे.-----------------------झोळ व भोसले घराण्यात भावकी कल्लोळ...कोर्टी जि. प. गटातून शिवसेना व काँग्रेस आय युतीतून निवडणूक रिंगणात असलेल्या सवितादेवी राजेभासले यांचे सख्ख्ये पुतणे नितीनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माया झोळ यांच्या बाजूने व चुलती सवितादेवी राजेभोसले यांच्या विरोधात प्रचार कार्य करीत असून तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माया झोळ यांचे दीर आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ शिवसेनेच्या उमेदवार सवितादेवी राजेभोसले यांच्या बाजूने व भावजय माया झोळ यांच्या विरोधात प्रचार कार्यात सक्रिय आहेत.--------------------करमाळा तालुक्याच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. स्व. नामदेवराव जगताप यांची तिसरी पिढी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांच्या रूपाने राजकारणात सक्रिय आहे. स्व. दिगंबरराव बागल यांची दुसरी पिढी रश्मी बागल व दिग्विजय बागल तालुक्याच्या राजकारणात आहेत. आदिनाथचे संस्थापक अध्यक्ष गोविंदबापू पाटील यांचे चिरंजीव नारायण पाटील आमदार आहेत. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जगताप, बागल घराण्यातील कोणीही वारस निवडणूक लढवित नसले तरी नात्या-गोत्यातील व पाहुणे-रावळे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत.--------------------विद्यमान आ. नारायण पाटील यांच्या पाटील कुटुंबातील चुलत भाऊ डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील कुंभेज गणातून शिवसेना पक्षाकडून उभे आहेत. माजी आ. जयवंतराव जगताप यांचे सोयरे स्व. सुभाष सावंत यांचे चिरंजीव अ‍ॅड. राहुल सावंत पांडे गणातून जगतापांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. ---------------------पाहुण्या-रावळ्यांचे मतदानकरमाळा तालुक्यात सर्वाधिक मतदार मराठा समाजाचा असून त्या खालोखाल धनगर समाज आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी अथवा साखर कारखाने कोणतीही निवडणूक असो मतदान करताना उमेदवार व समर्थक कार्यकर्ते सर्वात अगोदर नाती-गोती, पाहुणे-रावळे व सगे-सोयरे यांच्याकडे जाऊन मत मागतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही नात्या-गोत्याचे व पाव्हण्या-रावळ्याचे राजकारण सुरू झाले आहे.