शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे..

By admin | Updated: August 11, 2014 01:07 IST

आभास : भरदुपारी सूर्याभोवती तयार झालं नैसर्गिक आभामंडल

अकोला: रविवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी भरदुपारी सूर्याभोवती नैसर्गिक आभामंडल तयार झालं. जवळपास अर्धा तास स्पष्ट दिसलेल्या या गोलाकार खळय़ाला त्याच कालावधीत एका जेट विमानाने छेद दिला. त्यावेळी आकाशात निर्माण झालेल्या अनोख्या कलाकृतीमुळे जणू सूर्यनारायणासोबत धरणीमातेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आरंभला की काय, असा आभास निर्माण झाला होता. रविवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडलेल्या या खगोलीय घटनेची माहिती व दृष्ये अनेकांनी भराभर एसएमएस, व्हॉट्सअँप, फेसबुक अशा विविध माध्यमांद्वारे एकमेकांना कळविली व हा हा म्हणता संपूर्ण राज्यातील खगोलप्रेमींनी निसर्गाचे हे अनोखे दृश्य नजरेत कैद केले. याच कालावधीत आभामंडलातून गेलेल्या एका जेट विमानाच्या धुरामुळे एक रेषा निर्माण झाली होती. रक्षाबंधनाची सर्वत्र लगबग सुरू असताना, आकाशात निर्माण झालेल्या या नैसर्गिक कलाकृतीमुळे जणू सूर्यनारायणासोबत धरणीमातेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आरंभला की काय, असा भास निर्माण झाला होता.या घटनेमागील शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने येथील खगोल तज्ज्ञ नितीन ओक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वर्षा ऋतूमध्ये पृथ्वीच्या वातावरणात आर्द्रता निर्माण होत असते. श्रावण मास सुरू असल्याने सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उघाड असल्यामुळे, सूर्याच्या पडणार्‍या प्रखर किरणांमुळे पृथ्वीच्या वातावरणात भरपूर प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली. सूर्याच्या तुलनेत चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे चंद्राभोवती निर्माण होणारे लहानसे खळे आपण अनेकदा बघतो, अनुभवतो. त्यातलाच हा प्रकार आहे. सूर्य हा पृथ्वीपासून कोसो दूर आहे. आद्र्रतेमुळे पृथ्वीच्या वातावरणात निर्माण झालेल्या पाण्याच्या कणांवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते प्रकाशमान होतात. याच कारणामुळे रविवारी सूर्याभोवती आभामंडल दिसून आलं आणि गंमत अशी की, ज्या कालावधीत हे आभामंडल दिसलं, त्याच कालावधीत एका जेट विमानाने या आभामंडलास पूर्ण छेद दिला. केवळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हे दृष्य खगोलप्रेमींना दिसून आले.