शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसूच्या पावसाने राज्याला तारले

By admin | Updated: July 15, 2017 02:34 IST

गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेले काही दिवस ठाणे-मुंबईसह राज्यभरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. मात्र, सध्या पुनर्वसू नक्षत्र चालू असून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकरी बांधव ‘तरणा पाऊस’ म्हणतात आणि उशिरा का होईना, पुनर्वसू नक्षत्रातच पावसाचे पुनरागमन झाल्याने या ‘तरण्या’ पावसाने सर्वांनाच तारले आहे. १९ जुलैपर्यंत सूर्य पुनर्वसू नक्षत्रात राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. शेतकऱ्यांनी प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला गमतीशीर नावे दिलेली आहेत. त्याविषयी सोमण यांनी सांगितले, १९ जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करील. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. या काळात पाऊस संथ; पण सतत पडत असतो, म्हणून हे नाव पावसाला देण्यात आले असावे. २ आॅगस्ट रोजी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रातील पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. १६ आॅगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात. ३० आॅगस्ट रोजी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात पाऊस अगदी आज्ञाधारकासारखा पडत असल्याने या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. त्यानंतर, १३ सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करील. या नक्षत्रकाळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त असल्याने त्याला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात. २६ सप्टेंबर रोजी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे या नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ असे म्हणतात. १० आॅक्टोबर रोजी सूर्य चित्रा व २३ आॅक्टोबर रोजी स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर, मात्र पावसाळ्याचा मोसम समाप्त होतो.२२ जुलै रोजी सकाळी ११.२० वाजता ४.६२ मीटर उंचीची भरती येणार आहे. २३ जुलै दुपारी १२.०६ वाजता ४.८१ मीटर, २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता ४.८९ मीटर, २५ जुलै रोजी दुपारी १.३२ वाजता ४.८७ मीटर, २६ जुलै रोजी दुपारी २.१२ वाजता ४.७५ मीटर आणि २७ जुलै रोजी दुपारी २.५४ वाजता ४.५४ मीटर उंचीची भरती येणार आहे. ही लाटांची नव्हे तर भरतीच्या पाण्याची उंची असते, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.