शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या मुख्याधिका-यांची बदली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:16 IST

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर शासकीय अधिकाºयांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर राज्य प्रशासनाविषयी

राजेश निस्ताने  मुंबई : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर शासकीय अधिकाºयांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर राज्य प्रशासनाविषयी दिशाभूल करणारी व मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारी पोस्ट टाकणाºया नगरपरिषद मुख्याधिकाºयाची झालेली बदली ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी २६ मार्च रोजी रद्द ठरविली.प्रतीक्षा कालावधीतील त्यांचे वेतन देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी प्रमोद हरिभाऊ सावरखंडे यांना पूर्व पदावर तत्काळ नियुक्ती देण्याचे आदेशही जारी करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहेमतपूर नगरपरिषदेत ते कार्यरत होते. ३० जून २०१७ रोजी त्यांच्या जागेवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा येथील मुख्याधिकारी श्याम गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सावरखंडे यांंना कोणतीही नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले.बदलीमागील ठोस कारण स्पष्ट न झाल्याने अखेर सावरखंडे यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधीकरण) याचिका (क्र.६१४/२०१७) दाखल केली. त्यात नगरविकासच्या प्रधान सचिव आणि श्याम गोसावी यांना प्रतिवादी बनविण्यात आले.सुरुवातीला बदलीचे कारण प्रशासनाने सांगितले नाही. नंतर अवरसचिव मिलिंद कुलकर्णीयांनी १ आॅगस्ट २०१७ रोजी सादर केलेल्या शपथपत्रातून व्हॉटस्अ‍ॅप वरील वादग्रस्त पोस्टचे कारण पुढे आले.प्रकरण ‘मॅट’मध्ये असताना सावरखंडे यांना नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे तात्पुरती नियुक्ती देण्यात आली.