नागपूर : गेल्या वर्षीच्या प्रलंबित शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती या वर्षात करण्यात येत असून नोव्हेंबर अखेर्पयत तब्बल 1 लाख 95 हजार 784 विद्याथ्र्याचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर लेखी निवेदनाद्वारे दिली.
सामाजिक न्यायमंत्री यांनी निवेदनात म्हटले आहे, अनुसूचित जाती, ुविमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्याथ्र्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात. सदर योजनेंतर्गत सन 2क्13-14 मध्ये 2869.98 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली. त्यातून 15 लाख 74 हजार लाभार्थी विद्याथ्र्यासाठी 2867.क्3 कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.
परंतु ज्या विद्याथ्र्यानी मार्च 2क्14 मध्ये ऑनलाईन अर्ज भरले तसेच ज्या महाविद्यालयांनी विद्याथ्र्याचे अर्ज विहित कालावधीत संबंधित जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सादर केले नाहीत. तसेच सन 2क्13-14 मध्ये पुरेशा तरतुदीअभावी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.
सन 2क्13-14 मध्ये ज्या मागासवर्गीय विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी प्रलंबित आहे, त्यांची शिष्यवृत्ती सन 2क्14-15 मध्ये मंजूर असलेल्या निधीतून प्राधान्याने करण्याबाबतच्या सूचना 1 ऑगस्ट च्या पत्रन्वये समाजकल्याण आयुक्त पुणो व विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासवर्ग संचालनालय पुणो यांना देण्यात आलेल्या आहेत. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सन 2क्14-15 या वर्षासाठी अनुसूचित जातीसाठी 1141.95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)