शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

By admin | Updated: October 19, 2016 05:47 IST

नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे

करमाळा (जि. सोलापूर) : नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर मंगळवारी तोफ डागली. राज्यात गुन्हेगारी व पोलिसांवरील वाढलेले हल्ले, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असेही पवार यांनी सांगितले.येत्या नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करमाळा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शामलताई बागल उपस्थित होत्या. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६० टक्के युवक व नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. अवैध धंदेवाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षाचे सर्वेसर्वा श्रद पवार यांनी दिले असून, यामुळे पक्षाचा संदेश जनतेत चांगला जाईल, असे अजित पवार म्हणाले. जे पक्षाशी मागील निवडणुकीत गद्दारी करून अद्यापही पक्षाच्या पदावर आहेत अशांना जिल्हाध्यक्षांनी पदावरून काढून टाकावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. बडतर्फीची कारणेजिथे नगरपालिकेची निवडणूक आहे तेथेच आचारसंहिता लागू करावी. महापालिका व ग्रामीण क्षेत्रात विनाकारण आचारसंहिता लागू केल्याने विकासकामांवर याचा परिणाम होणार असून, निवडणूक आयोगाने यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री व मंत्री शहरात गेले की साखर, दूध, कांदा स्वस्त व्हायला पाहिजे असे सांगतात तर ग्रामीण भागात आले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने उसाला, दुधाला व कांद्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, अशा दोन्ही बाजूने बोलतात. सत्ताधारी बनवाबनवी करून जनतेची फसवणूक करीत आहेत.महागाई कमी करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. ते आता नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये घुसू पाहत असून, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहनही पवार यांनी केले. (वार्ताहर)>पूर्वी पन्नास लाखांत आमदार फुटायचेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत कोलांटउड्या सुरू आहेत. त्यावर भाष्य करताना पूर्वी ५० लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवकदेखील फुटत नाहीत, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.