शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाच जागांवर साथ देण्यास नकार

By admin | Updated: January 16, 2017 04:02 IST

युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे.

ठाणे : युतीच्या मुद्द्यावर सेना-भाजपमध्ये प्रचंड ओढाताण सुरु असतानाच या युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे. महापालिका निवडणुकीत रिपाइंने २0 जागांची मागणी केली असून, यासाठी वेळप्रसंगी भाजपची साथ सोडून शिवसेनेसोबत घरोबा करण्याची तयारीही या पक्षात सुरू आहे.ठाणे महापालिकेच्या २0१२ च्या निवडणुकीला सेना-भाजप एकत्रितरित्या सामोरे गेले होते. आता मात्र निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी युतीमध्ये बेबनाव कायम आहे. २0१२ च्या निवडणुकीत युतीच्या वाट्यातून रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर रिपाइंला विजय मिळाला होता. तरीही गेल्या पाच वर्षांमध्ये पक्ष बळकट झाला असल्याचा दावा करून, रिपाइंने यंदाच्या निवडणुकीत २0 जागांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात युतीबाबत अनिश्चितता असल्याने रिपाइंशी अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. युतीचे तळ्यात-मळ्यात असताना रिपाइंनेही पाच जागांवर साथ देण्यास नकार दिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. यंदा मात्र रिपाइंना पाच जागा देऊन उर्वरित पाच जागा भाजपला देण्याचा विचार सुरु आहे. त्याला रिपाइंनी विरोध दर्शविला आहे. सेना-भाजपची युती झाली नाही, तर २0 जागांची मागणी दोन्ही पक्षांकडे केली जाईल. जो पक्ष जास्त जागा देईल त्यासोबत युती केली जाईल, असे रिपाइं (आ) चे महानगराध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी स्पष्ट केले. रिपाइंची युती भाजपशी असली तरी, स्थानिक निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याबाबतचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक नेत्यांवर सोडला आहे. त्यामुळे केवळ भाजपचाच झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशी रिपाइंची भूमिका नसल्याचे तायडे यांनी सांगितले. शिवसेनेने पक्षाचा स्वाभिमान राखला, तर निवडणुकीत या पक्षासोबत जाण्याचीही आमची तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सेना-भाजपची युती झाली नाही तर दलित चेहरा कुणाबरोबर असेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. (प्रतिनिधी)