आयुक्त श्रावण हर्डीकर : प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नागपूर : शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगररचना विभागाची पुनर्रचना करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत दिले. शहराचा नियोजनबद्ध विकास व नकाशांना मंजुरी देण्याचे काम नगररचना विभागाचे आहे. परंतु या विभागाकडून के वळ नकाशांना मंजुरी दिली जाते. कोणत्याही स्वरूपाच्या विकास योजना राबविल्या जात नसल्याचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी निदर्शनास आणले. दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ व मनपा यांच्यात झालेल्या कराराची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यात ६६२०२ चौ.मीटर जागा रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव होता. परंतु विभागाने यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी टाळून केवळ नकाशे मंजुरीची कामे केली जातात. गेल्या तीन वर्षात विभागाने कोणती कामे केली याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.शहराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी नगररचना विभागाची असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. या संदर्भात बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले.(प्रतिनिधी)महत्त्वाचे निर्णयअभियोक्ता पदाचे नाव बदलवून विधी अधिकारी आकृ तीबंधासोबत पाच सदस्यीय समिती गठित करणार.उपायुक्त , अतिरिक्त उपायुक्तांच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव परतमोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी नवीन नियममनपा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचे निर्देशशिक्षण मंडळासाठी राज्य सरकारकडे अनुमती मागणार एलबीटी रिटर्न भरण्याची मुभापाच लाखाहून कमी व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्याला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुभा देण्यात येईल. दंड आकारला असल्यास तो माफ केला जाईल. अशी घोषणा महापौरांनी केली. एलबाीटी लागू झाल्यानंतर सर्व व्यवसायावर हा कर लावला जाईल, अशी व्यापाऱ्यांची धारणा झाली होती. तसेच अनेकांना याची माहिती नसल्याने अद्याप रिटर्न भरलेले नाही. त्यामुळे एलबीटी विभागाने आकारलेला दंड माफ करून व्यापाऱ्यांना रिटर्न भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली. होती.स्टारसाठी नवीन आॅपरेटर लवकरचशहरातील १८८ मार्गापैकी ११४ मार्गावरील स्टारबस सेवा बंद करणे व अन्य कारणावरून बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला १९ नोटीस बजवण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजय काकडे यांनी दिली. लवकरच नवीन आॅपरेटर नियुक्त केला जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी नवीन आॅपरेटरचा प्र्रस्ताव सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. मृताच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीकपिलनगर शाळेची इमारत कोसळल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील व्यक्तीला मनपात नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच नियमाचा अभ्यास करून मृताच्या कुटुंबीयांना अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
नगररचना विभागाची होणार फेररचना
By admin | Updated: January 21, 2015 00:25 IST