शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

माध्यमात हवे बदलाचे प्रतिबिंब

By admin | Updated: May 8, 2017 03:13 IST

गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना जनतेने स्वीकारल्या आहेत. यामधून एक नवी मानसिकता घडत आहे. देश बदलत असताना त्याचे प्रतिबिंब मात्र प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नसल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जावडेकर यांचे ‘बदलता भारत आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘देशामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. ग्रामीण विकास, दिव्यांगांसाठी योजना, कृषी विमा, साक्षरता, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत योजना राबविल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे त्यांनी सांगितले. एकीकडे शालेय मुले स्वच्छ भारताचे दूत बनून गावकऱ्यांसह आई-वडिलांनाही स्वच्छतेचे धडे देत आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक गावे हगणदरीमुक्त झाली आहेत, तर दुसरीकडे लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावरून देशवासीयांना सोमवारी उपवास सुरू केले होते. मोदींच्या आवाहनानंतर सव्वा लाख नागरिकांनी गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले. मायावतींनी भाजपाला मुस्लिम मते मिळणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, देशाची प्रगती आणि विकासात वाटा हवा असलेल्या नागरिकांनी भाजपाला मते दिली. संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे सदस्य लक्ष्मण मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सागर येवले यांनी आभार मानले....तर माध्यमे मागे पडतीलएलईडी दिव्यांनी वीजबचत होते, तसेच बिलही कमी येते. मात्र तीन वर्षांपूर्वी ३५० रुपये किंमत असणारे बल्ब आता ७० रुपयांना मिळत आहेत. सरकारने जगातल्या सर्व उत्पादकांना एकत्र बोलावून पाच वर्षांत १०० कोटी बल्बची आॅर्डर देतो, असे सांगत किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पूर्वी वैयक्तिक खिसे भरण्यासाठी ‘बार्गेनिंग’ व्हायचे; आता जनतेला किती देता यावर होते. मागील ७० वर्षांत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी जे झाले नाही ते मोदी सरकारने लाल दिवे काढून करून दाखवले. मात्र, हे बदल प्रसारमाध्यमांना दिसत नाहीत. हे बदल टिपले नाहीत तर माध्यमे मागे पडतील, असे जावडेकर म्हणाले.