शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:34 IST

राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात धारेवर धरले. त्याशिवाय दहशतवादी व गुंड एके-४७सारखी अत्याधुनिक शस्त्रे वापरत असताना पोलीस मात्र जुनी-पुराणी रिव्हॉल्व्हर वापरत आहेत, त्यांनाही आॅटोमॅटिक शस्त्रे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही सर्व सुविधा व भत्ते द्या. त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रभावी धोरण आखा. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. कॉन्स्टेबल पदावरचा माणूस हेड कॉन्स्टेबल होऊन निवृत्त होतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी पदोन्नती द्या. चांगले काम करणाऱ्या पोलिसांना काम करण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून द्या, असेही खंडपीठाने म्हटले. पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखिल राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. व्यवसायाने विकासक असलेले राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.न्यायालयाने फटकारलेया याचिकेच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मुंबईत सध्या प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांना आठ तास ड्युटी लावल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने हे धोरण राज्यभर राबवा, अशी सूचना सरकारला केली.‘आपल्याकडे पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करा. याबाबतही धोरण आखण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ असेही खंडपीठ हटले.