शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावाप्रमाणेच रेडीरेकनरचे दर

By admin | Updated: March 3, 2017 05:40 IST

यंदा बाजारभावाच्या प्रमाणातच मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

पुणे : यंदा बाजारभावाच्या प्रमाणातच मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे यंदाही मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दरवाढीस लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला.दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर जाहीर होतात. त्यावर मुद्रांक शुल्काची रक्कम ठरत असल्याने विशेषत: सदनिका, जमिनींसारख्या स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर त्याचा मोठा प्रभाव पडतो. वार्षिक मूल्य दर तक्ता अर्थात रेडीरेकनर दरासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, बाबूराव पाचर्णे, लक्ष्मण जगताप, नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे आदी या वेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, बांधकाम क्षेत्राला मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीतही घट झाली आहे. अनेक गृहप्रकल्प रखडले आहेत. रेडीरेकनर हा विषय केवळ बांधकाम विकसकांपुरताच मर्यादित नाही. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. घराच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने इतर भ्रष्ट मार्गाने कामे करून घेण्याची मानसिकता बळावते आहे. रेडीरेकनरचे दर ठरविताना समतोल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे यंदा या दरात वाढ न करणेच योग्य होईल. त्याबाबत मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे बापट यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)>रेडीरेकनर अंतिम टप्प्यातरेडीरेकनर अर्थात मुद्रांक व नोंदणी शुल्काचे दर ठरविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून सूचना मागविल्या जातात. तसेच विविध भागांत होणारे सदनिका व जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार, स्थानिक दर, माध्यमे व इतर प्रकारच्या जाहिरातीत असणारे मालमत्तेचे दर या सर्वांचा विचार करून नवीन दर ठरविले जातात. यंदादेखील बाजारभावाप्रमाणेच दर ठरविले जाणार असून, येत्या १० दिवसांत रेडीरेकनरचे दर स्पष्ट होतील, अशी माहिती मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.