शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजारस्थितीनुसार रेडीरेकनरची दरवाढ’

By admin | Updated: December 29, 2016 01:35 IST

नोटाबंदी व बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा रेडीरेकनरची दरवाढ किती असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्राथमिक स्तरावर

पुणे : नोटाबंदी व बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा रेडीरेकनरची दरवाढ किती असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, बाजारातील स्थिती लक्षात घेऊन दर ठरविण्यात येणार असल्याची माहिती सहनोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे यांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या वर्षी शासनाने स्टॅम्प ड्युटी कायद्यात बदल केला आहे. यानुसार रेडीरेकनरचे आर्थिक वर्ष १ जानेवारीऐवजी १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील. कायद्यात बदल केल्यामुळे गेल्या वर्षांपासून १ एप्रिलला रेडीरेकनरचे नवीन दर लागू होत आहेत. याबाबत बोंदार्डे म्हणाल्या, इतर सर्व आर्थिक व्यवहारांसाठी १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरले जाते; परंतु रेडीरेकनरसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे आर्थिक वर्ष निश्चित केले होते. सर्व व्यवहारांसाठी एकच आर्थिक वर्ष असावे, यासाठी कायद्यात बदल करण्यात आले. दरम्यान, रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यासाठी सध्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखील संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करीत आहे. संबंधित जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण असे दोन भाग यासाठी मानले जातात. वर्षभरात झालेले जमीन, फ्लॅटचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, प्रत्यक्ष रेडीरेकनरचे दर, बाजारातील स्थिती व लोकप्रतिनिधींचे मत आदी सर्व गोष्टींचा विचार करून दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्याचा प्रस्ताव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे बोंदार्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गेल्या वर्षीपासूनच नवे दर लागूगेल्या वर्षी शासनाने स्टॅम्प ड्युटी कायद्यात बदल केला आहे. यानुसार रेडीरेकनरचे आर्थिक वर्ष १ जानेवारीऐवजी १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील. कायद्यात बदल केल्यामुळे गेल्या वर्षांपासून १ एप्रिलला रेडीरेकनरचे नवीन दर लागू होत आहेत.