शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

५१ टक्के रहिवाशांच्या संमतीवर पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:56 IST

मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या वा खासगी जमिनीवरील इमारतींमधील ५१ टक्के रहिवाशांनी संमती दिल्यास त्या इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या वा खासगी जमिनीवरील इमारतींमधील ५१ टक्के रहिवाशांनी संमती दिल्यास त्या इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.मुंबईसह राज्यातील महापालिका, नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती आणि तेथील विकास कामांमध्ये येत असलेल्या अडथळ्यांबाबत विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये उपस्थित झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते.मुंबई उपनगरात मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये, भाडेकरू व्याप्त इमारतींमध्ये पुनर्विकासासाठी प्रोत्साहनात्मक एफएसआय दिला जाईल, असे जाहीर करतानाच, या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडालाच विशेष प्राधिकरण म्हणून जाहीर करण्याचा आणि त्याद्वारे पुनर्विकासात गतिमानता आणण्याचा शासनाचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एखादा विकासक पुनर्विकासात दिरंगाई करीत असेल, तर रहिवाशांना अन्य विकासकास काम देता येईल, असे ते म्हणाले. महाराष्टÑ ओनरशिप अ‍ॅक्टनुसार सध्या १०० टक्के रहिवाशांच्या संमतीनेच पुनर्विकास करता येतो.मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) एकच विकास नियंत्रण नियमावली चालू वर्षाअखेर लागू केली जाईल. विकासामध्ये सुसूत्रता येण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.२०१९ पर्यंत पुणे करणार डम्पिंगमुक्त-पुणे शहर २०१९ च्या अखेर डम्पिंगमुक्त करून कचºयाची त्याच दिवशी प्रक्रिया केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, वडगाव खुर्द येथे एक प्रकल्प उभारला जात आहे. रामटेकडी येथे दीड वर्षांत ७५० मेट्रिक टन क्षमतेचा कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहील. आणखी एका प्रकल्पासाठी जागा दिलेली आहे.इमारत बांधकामासाठी आॅनलाइन परवानगीइमारतींच्या बांधकामासाठीची परवानगी आॅनलाइन दिली जाईल. राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये ही पद्धत चालू वर्षाअखेर सुरू होईल. त्यानंतर, ड वर्ग, क वर्ग व इतर महापालिकांमध्ये ती लागू केली जाईल. मुंबई महापालिकेने तशी सुरुवात आधीच केली आहे. बांधकाम परवानगीतील मानवी हस्तक्षेप संपविला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.विश्वास पाटील यांच्या निर्णयांची चौकशी-एसआरएचे सीईओ असताना विश्वास पाटील यांनी जून २०१७ या एकाच महिन्यात एसआरए प्रकल्पाच्या १३७ फायली काढल्या या आरोपांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे, ती सखोल चौकशी करेल.१३७ पैकी ६४ प्रकरणांची छाननी झाली आहे. त्यातील कुठलाही प्रकल्प हा कार्यान्वित झालेला नाही. झालेल्या निर्णयांत अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. चौकशी अहवाल येत्या १५ दिवसांत आपल्याकडे येईल.