शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या भंगार बाजारात 500 रुपयांना लाल दिवा

By admin | Updated: February 11, 2017 22:39 IST

मंत्री, राज्यमंत्री तसेच राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनांना शासनाने लाल दिवा प्रदान केला आहे

ऑनलाइन लोकमत/सुमित देशमुख

जळगाव, दि. 11 -  मंत्री, राज्यमंत्री तसेच राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनांना शासनाने लाल दिवा प्रदान केला आहे. मंत्रालयीन सचिव तसेच आयकर विभागाच्या आयुक्तांनाही लाल दिवा आहे. वाहनावर लाल दिवा असणे प्रतिष्ठेचे व मानाचे समजले जाते, मात्र हाच लाल दिवा जळगावच्या भंगार बाजारात 500 रुपयाला विक्रीला आला आहे. 
 
अजिंठा चौकात असलेल्या भंगार बाजारात हा लाल दिवा आढळून आला. या दिव्याविषयी दुकानदाराला विचारणा केली असता शहरातील एका स्पेअर पार्टच्या दुकानातून खरेदी केलेल्या भंगारात हा दिवा आलेला आहे. खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागतील, असे दुकानदाराने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.
 
लाल दिव्याचा गैरवापर
गेल्या काही वर्षापूर्वी दहशतवादी बनावट लाल दिवा असलेल्या कारमधून नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात शिरले होते. तेव्हा सुरक्षा यंत्रणेचे वाभाळे निघाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार व सर्वोच्च न्यायालयाने लाल दिवा वापरासाठी आचारसंहिता ठरवून दिली होती. 
 
त्यानंतर हळूहळू ही आचारसंहिता शिथील झाली. अनेक ठिकाणी चोरटे व गुन्हेगारांनी लाल दिव्याच्या वाहनांचा वापर केल्याचे सिध्द झाले आहे. जळगाव शहराला गुन्हेगारी तसेच दहशतवादी घटनांची पार्श्वभूमी असताना भंगारात लाल दिवा उपलब्ध झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे या दिव्याचा गैरवापर होणार नाही याची शाश्वती काय? असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.