शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लाल परी झाली हायटेक

By admin | Updated: July 4, 2016 21:29 IST

साधी बस (लाल) म्हटली की, खिळखिळी बस आणि आदळआपट करीत होणारा प्रवास, असे चित्र नजरेसमोर येते; परंतु महामंडळाने आता खाजगी वाहतूकदारांशी स्पर्धा करताना

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. ४  : साधी बस (लाल) म्हटली की, खिळखिळी बस आणि आदळआपट करीत होणारा प्रवास, असे चित्र नजरेसमोर येते; परंतु महामंडळाने आता खाजगी वाहतूकदारांशी स्पर्धा करताना ही ओळख पुसली आहे. साधी लाल बसही आरामदायक आसन व्यवस्था, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहे. त्यामुळे लाल परी हायटेक झाली आहे.केंद्र शासनाने लागू केलेल्या ह्यएआयएस-५२ह्ण(आॅटोमोबाईल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार खाजगी आणि शासकीय बसची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील सर्व बसेसची बांधणी एकसारखी राहण्यास मदत होत आहे. राज्यात दापोली, नागपूर आणि औरंगाबादेत चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या बसगाड्यांची बांधणी करण्यात येते. चिकलठाणा कार्यशाळेत या नव्या नियमानुसार लाल म्हणजे साधी बसची बांधणी सुरू करण्यात आली. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या बसगाड्यांच्या तुलनेत या बसेस खिळखिळ्या होण्याचे प्रमाण कमी राहील. नव्या नियमानुसार बसेसची बांधणी करताना टपावरील कॅरिअर काढून टाकण्यात येत आहे. त्याऐवजी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी खालील भागात जागा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना सामान ठेवणे सहज शक्य होत आहे, असे चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील म्हणाले.प्रवासादरम्यान मोबाईलची चार्जिंग कमी होण्याने अनेकदा अडचणीला सामोरे जावे लागते. परंतु आता साध्या बसमध्येही प्रवास करताना प्रवाशांना मोबाईल चार्ज करता येणार आहे. त्यासाठी खास सॉकेट बसमध्ये बसविण्यात आले आहेत. कार्यशाळेतून गेल्या काही दिवसांत अशा ३० वर अत्याधुनिक सुविधांनीयुक्त बसेस बाहेर पडल्या आहेत.लाल बसमध्ये झालेला बदल१. पॉवर स्टेअरिंग.२. अ‍ॅन्टी ब्रेकिंग सिस्टीम.३. आरामदायक आसन व्यवस्था.४. आसन व्यवस्थेत आगप्रतिबंधक रेक्झिनचा वापर.५. आग प्रतिबंधक सिलिंडर (एकूण -२)६. चालकांसाठी आरामदायक आसन.६. पर्स ठेवण्यासाठी हुक.