शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य

By admin | Updated: May 10, 2016 03:55 IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे

मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतला सांगितले. उद्योगांनी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग मुंबई नजीकच्या तळोजा एमआयडीसीमध्ये यशस्वी झाला आहे. या नंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील मोठ्या एमआयडीसींमध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठीचे प्रकल्प उभारण्यात येतील. तसेच, उद्योगांनीही ते उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. असा पुनर्वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास पिण्यासाठी आणि शेतीसाठी अधिक पाणी देणे शक्य होईल, असे देसाई म्हणाले. आपल्याकडे वापरलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. अनेक देशांमध्ये असा पुनर्वापर केला जातो. सिंगापूर हे त्यासाठीचे मॉडेल मानले जाते. तेथील पाणी पुनर्वापराचा अभ्यास करण्यासाठी एमआयडीसीची एक चमू लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. उद्योगांना पाणी दिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याबाबत अन्याय होतो, अशी टीका बरेचदा होते. या बाबत देसाई म्हणाले की, पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. त्या नसुारच वाटप होत असते.उद्योगांवर पाणी पळविण्याचा आरोप होतो पण आज नवीमुंबई, मीरा भार्इंदर, ठाणे,उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, उरण व उरण तालुक्यातील २७ग्राम पंचायतींना एमआयडीसी स्वत:च्या पाणीसाठ्यांमधून पिण्याचे पाणी पुरविते. अशी राज्यात इतरत्रही अनेक उदाहरणे आहेत. (विशेष प्रतिनिधी)