शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या, सोयीच्या ठिकाणी नियुक्ती

By admin | Updated: May 18, 2017 00:10 IST

राज्य पोलीस दलातील सहा पोलीस अधीक्षक/उपआयुक्तांच्या फेरबदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाकडून जारी करण्यात आले.

- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलीस दलातील सहा पोलीस अधीक्षक/उपआयुक्तांच्या फेरबदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाकडून जारी करण्यात आले. मंगळवारी रात्री आणखी सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून नव्या जागी नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबईच्या मुख्यालयात बदली झालेल्या प्रवीण पवार यांची नवी मुंबई परिमंडळ-२च्या उपआयुक्तपदी फेरबदली करण्यात आली आहे. नागपूर लोहमार्गचे अधीक्षक साहेबराव पाटील यांची पदोन्नतीवर पुणे शहरात प्रशासन विभागात अप्पर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पहिल्या आदेशात त्यांची तुरुंग विभागाच्या औरंगाबादच्या उपमहानिरीक्षकपदी बदली दर्शविण्यात आलेली होती.अधीक्षक मनीषा दुबुले यांची नाशिक पीसीआरच्या ऐवजी नानवीजला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नानवीजला बदली दाखविलेल्या यशवंत सोळंखे यांना आता सीआयडीच्या अमरावतीचे अधीक्षकपद देण्यात आले आहे. तेथील अधीक्षक विजय खरात यांची मुंबईतील पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झालेल्या संजय जाधव यांना आता नवी मुंबईतील एसआरपी गट क्रं. ११ च्या समादेशकपद नियुक्ती केली आहे. गडचिरोलीच्या अप्पर अधीक्षकपदी बदली झालेल्या ज्योती क्षीरसागर यांची सीआयडीच्या पुणे मुख्यालयात आर्थिक गुन्हे अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदकुमार ठाकूर यांची नाशिकच्या पोलीस अकादमीत बदली करण्यात आली आहे.