शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरती घोटाळा, आठ दिवसांत कारवाई

By admin | Updated: March 23, 2017 23:50 IST

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांचा अहवाल निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्राप्त झाल्यानंतर आठच

मुंबई : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांचा अहवाल निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्राप्त झाल्यानंतर आठच दिवसांत राज्य शासन त्या अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. भाजपाचे सुरेश हाळवणकर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. २०१० ते २०१५ या काळात हा घोटाळा झाला. त्याविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अनेकदा आंदोलन केले. डी.व्ही. मुळे हे कुलसचिव असतानाच्या काळात गंभीर घोटाळे झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार का, असा प्रश्न हाळवणकर यांनी केला. त्यावर, निवृत्त न्यायाधीश शानबाग यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठच दिवसांत दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री वायकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आधीही चौकशी करण्यात आली होती आणि तिचा अहवालदेखील प्राप्त झालेला आहे. त्यात घोटाळे समोरदेखील आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात आधीही अनेक तक्रारी झालेल्या आहेत. विद्यापीठापासून मंत्रालयापर्यंत त्या दडवून ठेवण्यात आल्या, असा आरोप आहे. या प्रकरणी मंत्रालय अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल, असे वायकर यांनी भाजपाचे डॉ. सुनील देशमुख यांच्या उपप्रश्नात सांगितले. या प्रकरणातील एक चौकशी अहवाल १५ दिवसांपूर्वीच शासनाला प्राप्त झाला आहे; त्या आधारे कारवाईची मागणी सुजित मिणचेकर यांनी केली. तथापि, निवृत्त न्यायाधीशांच्या अहवालानंतर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री वायकर यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)