शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनात निवृत्तांची भरती

By admin | Updated: April 10, 2015 04:17 IST

अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) ३५२ पदे रिक्त असून, ही पदे भरण्याकरिता लोकसेवा आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) ३५२ पदे रिक्त असून, ही पदे भरण्याकरिता लोकसेवा आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. मात्र या पदांकरिता जर कर्मचारी उपलब्ध होत नसतील तर एफडीएमधून निवृत्त झालेल्या इन्स्पेक्टरांना कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येईल किंवा बीफार्म झालेल्यांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचा विचार करता येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना बापट म्हणाले की, एफडीएत ११७६ पदे आहेत. त्यापैकी ३५२ पदे रिक्त आहेत. माणसांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हे खाते असल्याने लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र पदांकरिता पात्र उमेदवार प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे ही पदे रिक्त न ठेवता याच खात्यातून निवृत्त झालेल्या इन्स्पेक्टरांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येईल. त्याखेरीज बीफार्म झालेल्यांना मानधन देऊन सेवेत दाखल करून घेता येईल. सरकारी रुग्णालयांत जेनरिक औषधांच्या उपलब्धतेबाबत बापट म्हणाले की, प्रत्येक सरकारी रुग्णालयात आमदार निधीतून जेनरिक औषधांचे दुकान सुरू करण्याची केंद्राची योजना आहे. (विशेष प्रतिनिधी)