शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच!

By admin | Updated: May 12, 2014 20:08 IST

तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील २२४० पदांचा समावेश

अकोला : महसूल विभागांतर्गत राज्यात तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचार्‍यांची २,२४० पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी लवकरच शासनामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.महसूल विभागांतर्गत लोककल्याणकारी विविध योजनांची कामे, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, जनगणना, रोजगार हमी योजना, पाणीटंचाई, चाराटंचाई व इतर प्रकारची कामे केली जातात. महसूल विभागामार्फत गतवर्षीपासून सुवर्णजयंती राजस्व अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त तहसील कार्यालय स्तरावरील नियमित कामेदेखील केली जातात. ही सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी पुरेशा कर्मचारी संख्याबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महसूल विभागातील तलाठी व लिपिक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव महसूल विभागामार्फत सादर करण्यात आला होता. गेल्या २७ जानेवारी २०१४ रोजी प्रधान सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत रिक्त पदे भरण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच तलाठी संवर्गातील १ हजार १२३ आणि लिपिक-टंकलेखक संवर्गातील १ हजार ११७ अशी एकूण २ हजार २४० रिक्त पदे भरण्याची शिफारसही समितीमार्फत करण्यात आली होती. महसूल विभागातील तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील ही रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय २६ फेबु्रवारी २०१४ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुषंगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडून संबंधित विभागातील तलाठी व लिपिक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदांची माहिती शासनाकडून मागविण्यात आली. या पृष्ठभूमीवर राज्यात महसूल विभागातील ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरूकरण्यात येणार आहे. ** रिक्त पदांची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे!महसूल विभागातील तलाठी व लिपिक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानुषंगाने शासनामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडून संबंधित विभागातील रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत संबंधित विभागागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच विभागीय आयुक्त कार्यालयामार्फतदेखील रिक्त पदांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे.