शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून राज्यभर ‘मेगा’ पोलीस भरती

By admin | Updated: February 3, 2016 03:39 IST

राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी १६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी ३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.राज्य पोलीस दलात १०.४८ टक्के महिला पोलीस कार्यरत आहेत. पोलीस दलात महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ होण्यासाठी रिक्त पदांच्या ३० टक्के पदे महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच बँड पथकातही महिलांनी अर्ज करून भरती व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कारागृह शिपाई पदासाठी वेगळी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. रिक्त जागा राहिल्यास या पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रतीक्षा यादीवर असलेल्या इच्छुक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भरतीत ३ टक्के पदे पोलिसांच्या पाल्यांसाठी व २ टक्के पदे ड्युटीवर असताना निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)कोल्हापुरात सैन्यभरती : महाराष्ट्रातील सहा व गोव्यातील दोन जिल्ह्यांमधील पात्र उमेदवारांसाठी कोल्हापुरात उद्या, बुधवारपासून सैन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात २० फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया चालणार आहे. यासाठी सुमारे ५७ हजार जण उपस्थित राहतील. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी या वेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.