शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

विद्यापीठाकडून निधी घेवूनही विद्यार्थ्यांकडून वसूली

By admin | Updated: May 8, 2014 22:24 IST

महाविद्यालयांकडून पे ॲण्ड पार्कचे कंत्राट काढून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून निधी परत घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पुणे: पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निधी दिला जातो,मात्र तरीही महाविद्यालयांकडून पे ॲण्ड पार्कचे कंत्राट काढून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून निधी परत घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे आकारले जातात. महाविद्यालयातर्फे पार्किंगचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार पार्किंगचे पैसे गोळा करण्यासाठी ज्या मुलांची नेमणूक करतो. ती मुले महविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींशी चांगल्या पध्दतीने वागत नाहीत. त्याचा प्रत्यय बी.जे.मेडीकल महाविद्यालयांना झालेल्या मारहाणीतून समोर आला आहे.पुणे विद्यापीशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांना पार्किंगचे शेड उभारण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यात पुणे शहरातील काही महाविद्यालयांचा समावेश आहे.परंतु,या महाविद्यालयांतर्फे सध्या विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे आकारले जात आहेत.शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने काही दिवस विद्यार्थ्यांकडून पार्किंगचे पैसे घेतले नाही.परंतु,एका महिन्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांकडून पार्किंगच्या नावाखाली वसूली सुरू झाली.-------------------------पार्किंगच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादामुळे विद्यार्थ्याला मारहाण कारणे निंदनिय आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांना पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.ज्या महाविद्यालयांनी हा निधी घेतला आहे.त्यांनी विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे वसूल करणे अयोग्य आहे. तसेच इतरही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पार्किंगचे पैसे आकारू नये या दृष्टीने विद्यापीठातर्फे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. -डॉ.वासुदेव गाडे,कुलगुरू ,पुणे विद्यापीठ