शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मार्तंड देव संस्थानकडून वसुली

By admin | Updated: April 3, 2017 01:49 IST

मार्तंड देव संस्थानची नगराध्यक्षांच्या मध्यस्थीने झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे २० लाख रुपयांची थकीत पाणीपट्टीची वसुली झाली

जेजुरी : जेजुरी नगरपालिका आणि मार्तंड देव संस्थानची नगराध्यक्षांच्या मध्यस्थीने झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे २० लाख रुपयांची थकीत पाणीपट्टीची वसुली झाली आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी देव संस्थानच्या विश्वस्तांचे आभार मानून शहराच्या विकासाबाबत पालिकेबरोबर राहण्याचे आवाहनही केले. जेजुरी नगरपालिकेची यावर्षीची केवळ ७० टक्केच करवसुली झाली आहे. यातील सर्वांत जास्त थकबाकी मार्तंड देव संस्थानकडे होती. देव संस्थानकडे जेजुरी नगरपालिकेची सन २००६ ते २०१२ या कालावधीतील सुमारे २० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत राहिली होती. पालिका प्रशासन आणि मार्तंड देव संस्थांनमध्ये सहमती होत नसल्याने थकबाकी तशीच राहिली होती. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी पुढाकार घेऊन पालिका पदाधिकारी व मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांची बैठक बोलावली होती. बैठकीला पालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह मुख्याधिकारी समीर भूमकर, गटनेते सचिन सोनवणे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा राऊत, बांधकाम समिती सभापती अजिंक्य देशमुख, नगरसेवक बाळासाहेब सातभाई, बाळासाहेब दरेकर, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे व पालिका प्रशासकीय कर्मचारी तसेच मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे, विश्वस्त सुधीर गोडसे, अ‍ॅड. किशोर म्हस्के, अ‍ॅड. दशरथ घोरपडे उपस्थित होते. बैठकीत जेजुरी पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या थकीत वीजबिलाबरोबरच देवसंस्थानकडून थकीत असलेल्या पाणीपट्टीबाबत चर्चा झाली. महावितरणकडून वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या करांची वसुली झाली तरच महा वितरणचे बिल भरणे शक्य होणार आहे. अशावेळी नागरिकांबरोबरच येथे येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. देव संस्थानने त्यांची पाणीपट्टीची थकबाकी भरून सहकार्य करण्याची विनंती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. देव संस्थानच्या विश्वस्तांनीही याबाबत सहमती दर्शवून रुपये २० लाख रूपयांचा धनादेश पालिकेच्या नगराध्यक्षांकडे सुपूर्त केला. देवसंस्थान आणि पालिकेने सहमतीपूर्वक जेजुरी शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.(वार्ताहर)