शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात विक्रमी पावसाची नोंद

By admin | Updated: June 29, 2016 02:32 IST

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हसळा तालुक्यात आतापर्यंत ७०७ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली

म्हसळा : गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हसळा तालुक्यात आतापर्यंत ७०७ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली असून २७ जूनला दुपारी बारा वाजेपर्यंत ४९ मि.मी. पाऊस पडला असून सोमवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.म्हसळा शहरातील गटारांची अवस्था बिकट असून गटारांची उंची व रुंदी कमी असल्यामुळे थोड्या पावसातही गटारे तुडुंब भरून सर्व पाणी रस्त्यावर येते. यामुळे विद्यार्थी, नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. गटारांच्या देखभालीसाठी प्रचंड निधी येवूनही नगरपंचायतीने गटारे रु ंद के ले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढा प्रचंड पाऊस पडत असतानाही तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. तालुक्याची आपत्कालीन व्यवस्था चोख असून अधिकारी आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)>जनजीवन विस्कळीतरेवदंडा : पावसाचा जोर वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. भाजी, फुले, फळ विक्रे ते यांना चांगलाच फटका बसला आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी सुखावला.>नागोठण्यात मुसळधार नागोठणे : मंगळवारी पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबा नदीसह नाले सुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने पावसाचा जोर रात्रभर असाच कायम राहिला, तर पुराची शक्यता नाकारता येत नाही.