शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपी सुरक्षा’ धोरणाचा पुनर्विचार करा, राज्य सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:50 IST

खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले, तसेच संरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काय पावले उलचण्यात येणार आहेत? अशी विचारणा करत, या संदर्भात तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.

मुंबई : खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले, तसेच संरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काय पावले उलचण्यात येणार आहेत? अशी विचारणा करत, या संदर्भात तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.पोलीस संरक्षण घेत असलेले त्यासाठीचे पैसे न भरणाºया राजकीय नेत्यांकडून व कलाकारांकडून सर्व थकीत रक्कम वसूल करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका, अ‍ॅड. सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.खासगी लोकांना संरक्षण देण्यासाठी १००० पोलिसांची नियुक्ती केली आहे. त्यातील ६०० पोलीस व्हीआयपींना संरक्षण देत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना खासगी सुरक्षारक्षकांप्रमाणे वागवू नका, असे पुन्हा एकदा न्यायालयाने सुनावले.गेल्या महिन्यात जशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तशीच आणीबाणीची स्थिती भविष्यात निर्माण झाली, तर सर्व पोलिसांना मदतीसाठी तैनात करावे लागेल. मग या १००० पोलिसांनाही मदतकार्यासाठी बोलविणार का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.पोलीस संरक्षण देऊ नका, असे आम्ही म्हणत नाही, पण ते केवळ पात्र लोकांनाच द्या. जर एखाद्या गरीब माणसाच्या जिवाला खरच धोका असेल, तर त्यालाही पोलीस संरक्षण द्या. मात्र, या संरक्षणाबाबत वेळोवेळी पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले.>स्वसंरक्षणासाठी पैसे भरू द्या‘तुम्ही (राज्य सरकार) याबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करा, अन्यथा जिवाला धोका नसतानाही कोणीही आयुष्यभर पोलीस संरक्षणाचा लाभ घेईल. जे लोक पोलीस संरक्षणासाठी पैसे मोजू शकतात, त्यांना त्यासाठी पैसे भरू द्या,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.