शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की कंत्राटासाठी खडसेंची शिफारस

By admin | Updated: August 7, 2015 01:46 IST

सूर्यकांता या चिक्की उत्पादक कंपनीलाच कंत्राट देण्याचे आदेश आपण कधीही दिले नव्हते. उलटपक्षी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी

मुंबई : सूर्यकांता या चिक्की उत्पादक कंपनीलाच कंत्राट देण्याचे आदेश आपण कधीही दिले नव्हते. उलटपक्षी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सूर्यकांताला चिक्की वाटपाचे कंत्राट देण्याकरिता शिफारस केली होती, असा आरोप माजी मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.महिला व बालविकास विभागाने सूर्यकांता या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिक्की उत्पादन करणाऱ्या कंपनीला कंत्राट दिल्यावरून गेले काही दिवस वादंग सुरू आहेत. याबाबतच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे उद्योगमंत्री असताना त्यांनी सूर्यकांताकडूनच चिक्की खरेदी करण्याचे आदेश दिल्याचा आरोप विधान परिषदेत केला होता. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, उद्योगमंत्री या नात्याने चिक्की खरेदीचा दर ठरवण्यापुरता आपला संबंध होता. आपण तसे आदेश दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा पुरावा द्यावा. याचा अर्थ माझे आदेश विद्यमान सरकारकडूनही पाळले जातात, असा होईल. मी मंत्री असताना कधीच कुठलेही कंत्राट विशिष्ट कंपनीला अथवा व्यक्तीला देण्याचा आग्रह धरलेला नाही. मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. उलटपक्षी सूर्यकांताला चिक्कीचे कंत्राट द्या, अशी शिफारस तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी २०१२मध्ये केली होती.विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिले तीन दिवस कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय अयोग्य होता. लोकांनी निवडून दिल्यावर आमदारांनी सभागृहात बसायला हवे होते. काँग्रेसची भूमिका काहीही असली तरी हे आपले वैयक्तिक मत असून, आपले मत जर पक्षाला अयोग्य वाटत असेल तर पक्षाने आपल्यावर कारवाई करावी, असे राणे म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या चर्चेवर केलेल्या भाषणात जाहीर केलेल्या योजना या केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सुरू झालेल्या योजना आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सभागृहात विरोधी पक्षाकडून चिरफाड व्हायला हवी होती, असेही ते म्हणाले. सूर्यकांताला चिक्कीचे कंत्राट देण्याची शिफारस मी केली व तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ती ऐकली म्हणजे विरोधी पक्षनेत्याचे ते ऐकत होते हे माझ्याकरिता समाधानकारक आहे. राणे दोन निवडणुका हरले आहेत. त्यामुळे त्यांना असे संशोधन करायला वेळ मिळतो. त्यांनी संशोधन करावे मी त्यांचे मार्गदर्शन घेईन. २०१२ची घटना त्यांना आत्ताच कशी आठवली?- एकनाथ खडसे, महसूलमंत्री