शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 8, 2017 01:28 IST

विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला

धनकवडी : शहरात कुठे आग लागली, इमारत कोसळली, लिफ्टमध्ये कुणी अडकले, विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला. पर्यायाने अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना. एक कॉल आला की नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ८ एप्रिल हा अग्निशामक दिन. अग्निशामक दलाचा स्थापन दिन आणि सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या आढाव्यात हे चित्र दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या एका केंद्रावर महिन्यातून सरासरी ३० कॉल येतात. कॉल आला की दलातील कर्मचारी आहे त्या साधनांसह मदतीसाठी धावतात. मात्र, अग्निशामक केंद्राच्या आवारात कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नाही, आवश्यक असणारे बूट, ड्रेसची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नवनवीन साधने असताना, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अद्यापही पारंपरिक साधनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.कात्रज अग्निशामक केंद्रामध्ये एका अधिकाऱ्यासह २५ जवान, एक वाहन आणि प्राथमिक स्तरावर काम करण्याइतपत साधनसामुग्री उपलब्ध आहे. जादा साहित्याची आवश्यकता भासल्यास मुख्यालयातून मदत मागवावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी संकुल नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न परिसरातील वातावरणामुळे गंभीर झाला आहे. याच परिसरात असणारे कचरा संकलन केंद्र व तीन बायोगॅस प्रकल्प यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, डास यामुळे जवान त्रासले आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार केला तरी याची कुणी दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे दु:ख आहे. >शहराच्या नकाशाची आवश्यकताअग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अडचण होते ती झोपडपट्टी परिसरात. झोपडपट्टी परिसरात आग लागली किंवा एखादी दुर्घटना घडली तर तिथपर्यंत तत्काळ पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचण्यास आणखी एक समस्या असते, ती वाहतूककोंडीची. कोंडीतून रस्ता काढणे मोठे जिकिरीचे असते. अग्निशामक विभागाकडे शहराचा नकाशा नसल्याने दुर्घटना घडली, त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे शक्य होत नाही.आगीत सापडलेल्या किंवा बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जवान स्वत:च्या जिवाची पर्वा करीत नाही. अशा बहाद्दर जवानांच्या समस्या सोडविण्यात, चांगले काम केल्यानंतर प्रशासनाकडून कौतुकाची थाप दिली जात नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.