शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘रासप’ उपाध्यक्षांच्या घरावर प्राप्तीकरचा छापा

By admin | Updated: December 17, 2015 00:38 IST

राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष डॉ़ रत्नाकर गुट्टे यांचा परळीतील बंगला व गंगाखेडमधील साखर कारखान्यावर बुधवारी औरंगाबादच्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

परळी/गंगाखेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष डॉ़ रत्नाकर गुट्टे यांचा परळीतील बंगला व गंगाखेडमधील साखर कारखान्यावर बुधवारी औरंगाबादच्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. गुट्टे यांच्याबरोबरच त्यांचे जावई व राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या कन्हेरवाडी येथील घरावरही प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.बुधवारी सकाळी ८़३० ते ९ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादचे चार अधिकारी, दोन कर्मचारी, एक फौजदार व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील कारखान्याच्या कार्यालयात आले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. तपासणीत नेमके काय आढळले, याची माहिती मिळू शकली नाही़ ‘गंगाखेड शुगर’चे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे म्हणाले की, प्राप्तीकर विभागाकडून वार्षिक तपासणी केली जात आहे.बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडी येथीलफड यांच्या घरी सकाळी सहा वाजल्यापासून अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फड यांनी ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडीच्या वेळी हेलिकॉप्टरने मतदानासाठी कन्हेरवाडी येथे आणले होते. त्यावरून ते चर्चेत आले होते. दरम्यान,गुट्टे यांच्या नातेवाईकांच्याही घरावर छापे टाकल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)