शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बंदीमुळे आठवडा बाजारात ग्राहकांची मंदी

By admin | Updated: November 13, 2016 16:46 IST

यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले.

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभाईंदर, दि. 13 - मीरा-भार्इंदरमधील नागरिकांसाठी सोईस्कर ठरलेल्या यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले. भार्इंदर पश्चिमेकडील स्टेशन रोडवर दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात शहरासह आसपासच्या ठिकाणचे विक्रेते येत असतात. हा बाजार स्थानिकांना सोईस्कर ठरत असल्याने श्रीमंतापासुन गरीबांपर्यंतची लोकं या बाजारात आवश्यक वस्तु खरेदीसाठी येत असतात. प्रत्येक सणवारीलाही हा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातो. महत्वाचा ठरलेला हा आठवडा बाजार ऐन वाहतुकीच्या रस्त्यावर भरत असल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी लोकांच्या अंगवळणी पडल्याने ग्राहकांची या बाजारात विनातक्रार खरेदी सुरूच असते. सततच्या वाहतुक कोंडीमुळे हा बाजार येथील दिडशे फुट मार्गावरील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. सुरक्षिततेच्या कारणसास्तव त्याला पोलिसांकडुन नकारघंटा मिळाल्याने हा बाजार जैसे थे आहे. शिवाय या बाजारामुळे बाजार कर वसुल करणा-या कंत्राटदारांचे चांगभले होत असल्याने बाजाराच्या स्थलांतराला अप्रत्यक्षपणे विरोध केला जात आहे. हवी तशी कर वसुली होत असली तरी या बाजारात चांगले ग्राहक तसेच उत्पन्न मिळत असल्याने विक्रेते या बाजारात वस्तू विकण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आवर्जून येत असतात. दर आठवड्याला बाजारात होणा-या गर्दीवरून विक्रेत्याची उलाढाल प्रत्येकी किमान दीड हजार ते कमाल २५ हजार रु. इतकी होत असते. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुललेला हा बाजार १३ नोव्हेंबरच्या रविवारी तुरळक गर्दीचा दिसला. गेल्या ९ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आलेल्या हजार, पाचशेच्या नोटा मिळविण्यासाठी व्यस्त असलेल्या ग्राहकांनी यंदाच्या बाजाराकडे पाठ फिरविल्याची चर्चा विक्रेत्यांमध्ये सुरु होती. परंतु, ज्यांनी नोटा बदलुन घेतल्या, त्यांतील काहींनी बाजारात जाणे पसंत केले. त्यातही बदलुन मिळालेल्या नवीन नोटा दोन हजारांच्या असल्याने सुट्टे पैशांअभावी विक्रेत्यांनी त्या स्विकारल्या नसल्याचे सांगितले. एका बाजुला लोकांची बँकांच्या बाहेर गर्दी तर आठवडा बाजार ग्राहक मंदीचा असल्याचे दिसुन आले. अपेक्षित ग्राहकांअभावी अनेक विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसुन होते. याबाबत विक्रेते अफजल खान म्हणाले, यापुर्वीच्या आठवडा बाजारात दुपारी एक पर्यंत किमान १५ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता, तो यंदा केवळ नोटांच्या गोंधळामुळे ग्राहक रोडावल्याने १० टक्के सुद्धा झाला नाही. तसेच विक्रेते शिवलाल यादव म्हणाले, अनेक ग्राहक जुन्या हजार, पाचशेच्या नोटा देत होते. तर काही दोन हजारांच्या नोटा देत होते. जुन्या नोटा स्वीकारल्या नसल्या तरी नवीन नोटा सुट्या पैशांअभावी परत कराव्या लागल्या. यामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाला.