शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरांचे स्वप्न होणार साकार

By admin | Updated: June 10, 2017 01:27 IST

मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला दिलेली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवली आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला असून, विकासकांकडूनही या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी आखलेल्या या योजनेमुळे जुन्या आणि बेकायदेशीर असलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील ३७ टक्के जागेवर १ कोटीहून अधिक जनतेला सामावून घेण्यासाठी या गृहनिर्माण धोरणाची आखणी केली आहे. मुंबईत म्हाडाच्या एकूण १०५ वसाहती असून, त्या वसाहतींमधील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून धोरण बनवताना चार एफएसआयचा लाभ म्हाडा वसाहतींना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांच्या वसाहतींमध्ये मूळ भाडेकरू तसेच रहिवासी राहत आहेत. परंतु संक्रमण शिबिरात राहत असलेल्या मूळ भाडेकरूंच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्यामुळे त्यांच्यावर संक्रमण शिबिरात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे घरांचे स्वप्न या निर्णयामुळे पूर्ण होणार आहे.विकासकांची राष्ट्रीय संघटना असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)चे कोषाध्यक्ष रोहित पोतदार म्हणाले की, या निर्णयामुळे मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास सुरुवात होईल. घरांच्या किमतींमध्ये घट होणार नसली, तरी शहराबाहेर गेलेले मोठे विकासक मोठे प्रकल्प मिळवण्यासाठी पुनर्विकासाच्या क्षेत्रात उडी घेताना दिसतील. असे असले तरी शासनाने शहरातील वाहतुकीचा वेग वाढवण्याची गरज आहे. कारण एवढ्या मोठ्या योजनेची अंमलबजावणी करताना, वाहतुकीवर ताण पडेल. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडणार नाही याची काळजी घेतानाच नागरी वाहतूक प्रकल्पांना वाव देण्याची नितांत गरज आहे.