शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पहिली ‘बॅटरी एसयूव्ही’ धावण्यास सज्ज !‘एक्स टेक्स्ला’ एसयूव्हीचा नेदरलँड-मुंबई प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 03:01 IST

वाढते प्रदूषण आणि डिझेल-पेट्रोलच्या अनियंत्रित किमतींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळेच सध्या सरकारतर्फे विजेवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले जात आहे.

महेश चेमटे मुंबई : वाढते प्रदूषण आणि डिझेल-पेट्रोलच्या अनियंत्रित किमतींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळेच सध्या सरकारतर्फे विजेवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले जात आहे. देशात पहिली इम्पोर्टेड विद्युत एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) एक्स टेक्स्ला कार मुंबईत दाखल झाली आहे. विजेवर चालणाºया या अत्याधुनिक एसयूव्ही कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओमध्ये पूर्ण करण्यात आली. सुमारे तीन कोटी रुपये किमतीच्या या कारसाठी आरटीओतर्फे सुमारे ४० लाखांहून अधिक रकमेची ‘करसूट’ देण्यात आली आहे.मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात या विद्युत एसयूव्हीची नोंदणी झाली. ही कार ७ आसनी आहे. पूर्णपणे विजेवर चालणाºया या एसयूव्हीचा टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डीपब्ल्यू रंगाची कार गेल्या आठवड्यात मुंबईत सागरी मार्गाने कंटेनरमधून दाखल झाली. गेल्या आठवड्यापासून या कारची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. या कारची किंमत २ कोटी ८९ लाख रुपये आहे. ताडदेव आरटीओमध्ये शहरातील खासगी गुंतवणूक कंपनीच्या नावे या कारची नोंदणी झालेली आहे.साधारणपणे एक कोटी किंमत असलेल्या इम्पोर्टेड कारसाठी २० लाखांपर्यंत कर आकारला जातो. मात्र ही विद्युत कार असल्यामुळे आरटीओमधून कोणत्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. यामुळे देशातील पहिल्या ‘इम्पोर्टेड विद्युत’ एसयूव्ही कारला तब्बल ४० लाखांहून अधिक रकमेची घसघशीत सूट मिळाली आहे.आगामी २०३० सालापर्यंत देशात १०० टक्के वाहने ही विजेवर धावणारी असतील, असे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. ही कार सुरक्षित, वेगवान आणि एसयूव्ही प्रकारातील सर्वांत उच्च श्रेणीची आहे. यामध्ये आठ कॅमेरे आणि १२ सेन्सर आहे. धूरके, धुके, पाऊस आणि धूळ यांच्यापासून चालकाला कार चालवताना सोपे जाईल, अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही कार २.९ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास एवढा वेग घेते, असा दावा संबंधित कार कंपनीच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.नेदरलँड ते मुंबई-नेदरलँड येथून ही कार इम्पोर्ट करण्यात आली. गेल्या आठवड्यात सागरी मार्गाने कंटेनरमधून ही कार मुंबईत दाखल झाली. विद्युत कार असल्यामुळे या कारची नोंदणी प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. मात्र संबंधित अधिकाºयांनी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आरटीओ अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईcarकार