शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

By admin | Updated: July 18, 2016 04:59 IST

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचे पाकीट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून त्यांच्यासमोरच उघडले जाईल. प्रथम गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, अन्य ट्रेनमध्ये सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. आयआरसीटीसीकडून या पूर्वीच खाद्यपदार्थांची सेवा देणारी ‘फूड आॅन ट्रॅक’नावाने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये आवडते खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे, तसेच १८00१0३४१३९ किंवा १३९ वर एसएमएस पाठवून सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. २0१६ मध्ये जून महिन्यापर्यंत २२ हजार ४११ जणांनी जेवणाची आॅर्डर दिली आणि एकूण ४५ हजार ९५५ साठी जेवण देण्यात आले. प्रत्येक दिवशी सरासरी २४९ जेवणाच्या आॅर्डर येत आहेत. रेल्वेच्या देशभरातील सगळ्या झोनमधून एकूण १ लाख १३ हजार ८८४ आॅर्डर आल्या आहेत. असे असतानाच आयआरसीटीसीकडून ‘रेडी टू इट’नावाने आणखी एक खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरीस आयआरसीटीसीने म्हैसूर येथील डिफेन्स फूट रिसर्च लॅबोरेटरीसह करार केला असून, त्यानुसार आरोग्यदायक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रेडी टू इटद्वारे प्रवाशांना बंद पाकिटातून खाद्यपदार्थ दिले जातील. खाद्यपदार्थांतील घटकांची पोषणमूल्ये अबाधित ठेवून नवीन तंत्रज्ञानानुसार ते पदार्थ गोठवण्यात आलेले असल्याने, बंद पाकिटांसह पदार्थ उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावी लागतील आणि त्यानंतरच ते पाकिटातून बाहेर काढून प्रवाशांना खावे लागतील. यामुळे पदार्थाचा दर्जा चांगला राहील आणि आरोग्याला हानीही पोहोचू शकणार नाही, असा दावा आयआरसीटसीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, शाकाहारी बिर्याणी, राजमा-भात आणि डाळ-भात प्रवाशांना मिळेल.>प्रवाशांनी मागणी केलेले बंद पाकिटातील जेवण हे १५0 ग्रॅम ते ३00 ग्रॅमपर्यंत मिळेल. त्याची किंमत ही ४0 रुपये एवढी असेल. हे पाकीट प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात ठेवले जाईल आणि त्यांच्यासमोरच ते उघडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेला पॅन्ट्री डबा जोडण्याचीही गरज लागणार नाही.