शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी 'फेस रीडिंग'

By admin | Updated: March 21, 2017 03:50 IST

राज्यभरात बारावीच्या परीक्षेत चार पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पेपरफुटी प्रकरणाने बोर्डाची डोकेदुखी वाढली

मुंबई : राज्यभरात बारावीच्या परीक्षेत चार पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पेपरफुटी प्रकरणाने बोर्डाची डोकेदुखी वाढली, याची पुनरावृत्ती विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून प्रश्नपत्रिकांची सुरक्षा वाढवण्यात आली. परीक्षा केंद्रात आॅनलाइनद्वारे प्रश्नपत्रिका पाठवूनही पेपरफुटी होण्याचा धोका असल्यामुळे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी ‘फेस रीडिंग’ सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्याचबरोबरीने रेकॉर्डिंग आणि वॉटर मार्किंग सिस्टिमही तयार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढल्यापासून परीक्षा काळात प्रश्नपत्रिकेची सुरक्षा हा यंत्रणेसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. परीक्षेच्या काळात प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाइन प्रश्नपत्रिका पाठवण्यास सुरुवात केली. तरीही यात काही त्रुटी राहिल्याने पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. या वेळी हे टाळण्यासाठी फेस रीडिंग सिस्टिम सुरू केली आहे. प्रत्येक महाविद्यालयातील चार व्यक्तींचे फेस रीडिंग घेतले आहे. या चार जणांनाच आॅनलाइन आलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. विद्यापीठाच्या सिस्टिममधील फोटोशी चेहरा जुळला तरच पुढील प्रक्रिया सुरूहोईल. फेस रीडिंग झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक लॉग इन आयडीचा मेसेज येईल. हा आयडी टाकल्यानंतरच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड झाल्यानंतर त्याच खोलीत प्रिंटरवर प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वाटप थेट वर्गात होेईल. यामुळे प्रश्नपत्रिकावाटपातील व्यक्तींचा समावेश कमी होणार आहे. या सर्व प्रक्रियेचा लाइव्ह व्हिडीओ काढला जाणार असून, तो थेट परीक्षा केंद्रातील कंट्रोल रूममध्ये प्रसारित होणार आहे. (प्रतिनिधी)