शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

वाचा, कल्पना करा, लिहा!

By admin | Updated: January 19, 2016 03:18 IST

‘‘वाचनातून आपण माणूस म्हणून घडत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याउलट टीव्हीमुळे कल्पनाशक्तीला कुंपण घातले जाते.

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)‘‘वाचनातून आपण माणूस म्हणून घडत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याउलट टीव्हीमुळे कल्पनाशक्तीला कुंपण घातले जाते. लोकांनी आपल्यावर टीका केली, तरी सकारात्मकतेने आयुष्याला सामोरे जा. भरपूर वाचा, मनाला आणि बुद्धीला खाद्य पुरवा, अनुभवसमृद्ध व्हा आणि मग लिहिते व्हा’’ असा गुरुमंत्र लेखक चेतन भगत यांनी गप्पांच्या ओघात तरुणाईला दिला.साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच ‘यूथ आयकॉन’ अशी ओळख असलेल्या लेखक चेतन भगत यांचा तरुणाईशी खास संवाद आयोजित करण्यात आला होता. चेतन भगत यांनी आयुष्याचे विविध टप्पे, अनुभव, पुस्तकांमागील विचारप्रक्रिया याबाबत दिलखुलासपणे एक एक पदर उलगडला. संमेलनातील ही मुलाखत सर्वाधिक रंगली आणि खुलली.मराठीतून रसिकांना अभिवादन करत त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. ‘प्रेमाला नसते भाषेचे कुंपण, तिथे असते शब्दांची गुंफण’ असे सांगत त्यांनी संवाद साधला.मराठी संस्कृतीचे तोंडभरून कौतुक करताना चेतन भगत म्हणाले, ‘‘आजकाल मुलांसमोर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांचे मन स्थिर नाही. त्यांना कंटाळा येण्याची भयंकर भीती वाटते. त्यांच्या कल्पनाविलासावर मर्यादा येतात. मुलांना चिमण्यांपेक्षा ‘अँग्री बर्ड’ जास्त जवळचा वाटतो. यातून बाहेर काढण्यासाठी मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे. एकाग्रता नसेल, तर चांगला विद्यार्थी घडत नाही.’’चेतन भगत यांनी तरुणांना स्वत:च स्वत:चे प्रेरणास्थान बनण्याचा मैत्रीचा सल्ला दिला. मनाचा आवाज ऐका आणि पुढे जा. प्रत्येक जण आपल्याबद्दल मते नोंदवत असतो. ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे सूत्र डोक्यात ठेवून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल, असे त्यांनी सांगितले. याच वेळी स्वत:च्या संस्कृतीवर प्रेम कराच; पण, इतरांच्या संस्कृतीचा अनादर करू नका, असेही सांगितले. आजच्या तरुणांनी चतुर व्हावे की रांचो? असे विचारले असता, या दोन्हींचा प्रत्येकाने समतोल साधला पाहिजे, असा युक्तिवाद चेतन भगत यांनी केला. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक तरुणामध्ये चतुर आणि रांचो वसलेला आहे. या दोहोंचा समतोल कसा साधायचा, ही हातोटी शिकली पाहिजे. जीवनात बरेच धक्के खावे लागतात. एक रस्ता बंद झाला, तर दुसरा खुला होतोच. त्यामुळे नैराश्याला जीवनातून डिलिट करा. आयुष्यात भरपूर मजा करा. पण, भविष्याकडेही गांभीर्याने पाहा. करिअरची अनेक दालने तरुणांसमोर खुली आहेत. अशा वेळी मनाचा आवाज ऐका आणि आत्मविश्वासाने पुढे जा.’’आकडे आणि कृष्णचेतन भगत यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात आकड्यांचा वापर केलेला असतो. तसेच, पुस्तकातील नायकाचे नाव कृष्णाच्या नावाशी निगडित असते. याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘‘मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि बँकेतही काम केले आहे. त्यामुळे आकड्यांशी जवळचा संबंध आहे. याच आकडेमोडीच्या आठवणी पुस्तकांच्या नावांमधून मी जपतो. माझे कृष्णावर खूप प्रेम आहे. एका पुस्तकाचा खप १ कोटी असेल आणि प्रत्येक पुस्तकात नायकाचे नाव किमान ६० वेळा वापरले जात असेल, तर माझ्यामुळे ६०० कोटी वेळा कृष्णाचा जप केला जातो.’’यावर पडल्या टाळ्या!माझे वय राहुल गांधींपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते ‘मोस्ट इलिजिबल बॅचलर’ आहेत, तोवर मीही तरुणच राहणार!भारतात असेच घडते...एखादी मुलगी आवडते, खास ठरते, पण ती पूर्ण गर्लफ्रेंड नसते. तेव्हा आम्ही तिला ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणतो!अभिनेत्याचे केवळ रंग-रूप पाहिले जाते; तर लेखकाचे विचार परावर्तित होतात. नायकापेक्षा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद जास्त भावतात.